आमदार भारती साहेब यांच्या निधीतून जि.प.सावर्डे शाळेला कॉम्पुटर, बॅटरी, किबॉर्ड साहित्य देण्यात आले

82

आमदार भारती साहेब यांच्या निधीतून जि.प.सावर्डे शाळेला कॉम्पुटर, बॅटरी, किबॉर्ड साहित्य देण्यात आले

 

सुनिल जाबर

जव्हार प्रतिनिधी

जिल्हा परिषद शाळा सावर्डे येथे आमदार भारती साहेब यांच्या निधीतून शाळेला कॉम्पुटर, बॅटरी, किबॉर्ड इत्यादी साहित्य देण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते मिलिंद झोले यांच्या प्रयत्नामळे आज शाळेला कॉम्पुटर संच मिळाला.ह्या संचा मुळे शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी तसेच उपस्थिती वाढवण्यासाठी व ऑनलाईन काम करण्यासाठी या कॉम्प्युटर संचाचा खूप उपयोग होणार असून, पहिली ते पाचवी पट ४२ असून एकच शिक्षक असल्यामुळे या ऑल-इन-वन कॉम्प्युटरचा उपयोग विद्यार्थ्यांना शालेय उपक्रम ,शालेय अभ्यास शिकवण्यासाठी अतिशय उपयुक्त असून, एक शिक्षकाचे काम हे ऑल इन कॉम्प्युटर करणार आहे .असे शाळेचे मुख्याध्यापक संतोष बोंद्रे यांनी सांगितले.

सावर्डे गावचे माजी सरपंच ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमान पादीर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच मोखाडा तालुक्यातील विभाग शिक्षण विस्तार अधिकारी अनिल कडू यांचे सेवानिवृत्ती समारंभ सावर्डे शाळेत आयोजित केला होता. कडू यानी आपले तीस-पस्तीस वर्षे सेवा करत असताना अतिषय प्रामाणिकपणे शालेय शिक्षण विभागात काम केले ,सावर्डे शाळेला सतत भेट देऊन मार्गदर्शन करत असत, त्यामुळे मुख्याध्यापक संतोष बोंद्रे यांनी सेवानिवृत्ती समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. गावचे सरपंच व ग्रामस्थांनी यावेळी अनिल कडू यांचं शाल व श्रीफळ देऊन स्वागत केलं.तसेच सर्व ग्रामस्थांनी मुख्याध्यापक संतोष बोंद्रे यांनी आमदार श्रीकांत भारतीय साहेब यांचे व मिलिंद झोले यांचे आभार मानले.