जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

172
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

रायगड जिल्ह्यातील 16 शिक्षकांना पुरस्कार

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. २०२४/२५ या शैक्षणिक वर्षातील प्राप्त प्रस्तावांमधून समितीमार्फत मूल्यांकन करुन, प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. तसेच दीव्यांग प्रवर्गातून एका शिक्षकाची विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व प्राथमिक शिक्षण अधिकारी पूनीता गुरव यांनी दिली आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा ५ सप्टेंबर हा जन्म दिवस दरवर्षी शिक्षक दोन म्हणून साजरा करण्यात येतो.यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. जिल्ह्यातून २०२४ च्या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांमधून प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

अलिबाग तालुक्यातील अजित हरवडे यांची जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, पेण तालुका भास्कर पाटील, पनवेल तालुका जयदास घरत, कर्जत भगवान घरत, खालापूर तालुका राजेंद्र फूलावरे, उरण तालुका सुचिता जोशी, सुधागड तालुका जनार्दन भिलारे, रोहा तालुका लिना सुर्वे, महाड तालुका श्रध्दा मांडवकर, श्रीवर्धन तालुका प्रशांत वाणी, म्हसळा तालुका रमेश जाधव, पोलादपूर तालुका चंद्रकांत उतेकर, माणगाव अपूर्वा जंगम, तळा तालुका अमिष भौड, मुरुड तालुका देवानंद गोगार यांना जिल्हा आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर पेण तालुक्यातील महेश पाटील यांना दिव्यांग श्रेणीतून विशेष शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
……………………