शेकाप तर्फे जिल्हास्तरिय वकृत्व स्पर्धा

27

शेकाप तर्फे जिल्हास्तरिय वकृत्व स्पर्धा

मा. राज्यमंत्री स्व. मीनाक्षीताई करंडक वकृत्व स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग: शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील यांच्या जयंतीनिमित्त अलिबागमध्ये शेतकरी भवन येथे शनिवारी (दि.13) जिल्हास्तरिय खुल्या वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना मा. राज्यमंत्री स्व. मीनाक्षीताई वकृत्व करंडक 2025 देऊन गौरविण्यात येणार आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या स्व. मीनाक्षी पाटील यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रात मोलाचे योगदान राहिले आहे. विधानसभेत आमदारपासून ते राज्यमंत्री म्हणून त्यांनी सक्षमपणे भूमिका बजावली आहे. आपल्या वकृत्वाने सभागृहाला आणि सरकारला प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भाग पाडण्यात त्यांचा एक वेगळा हातखंडा होता. उत्तम वक्त्या तसेच संसदपटट्ू म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या कार्याचे स्मरण राहवे, यासाठी शेकापच्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरिय वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी विद्यार्थी संघटना अलिबाग, पुरोगामी युवक संघटना अलिबाग, शेकाप सांस्कृतिक सेल अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मा. राज्यमंत्री स्व. मीनाक्षीताई वकृत्व करंडक 2025 वकृत्व स्पर्धा 13 सप्टेंबरला होणार आहे.
या स्पर्धेत स्थानिक प्रश्नांचे राज्यस्तरिय नेतृत्व मीनाक्षीताई पाटील, येवा कोकण आपलोच असा-पण विकासाचं काय?, सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे, संघर्षातून आत्मनिर्भरतेकडे, नफरत के बाजार मे मोहोब्बत बेच रहा हूं मै, सकारात्मक बदलाची सुरुवात-व्यक्तीच्या प्रयत्नातून समाजापर्यंत, रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग या विषयांवर वकृत्व स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला रोख रक्कम 11 हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला रोख रक्कम 8 हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकाला रोख रक्कम 5 हजार रुपये व चषक, चतुर्थ क्रमांकाला रोख रक्कम 3 हजार रुपये व चषक तसेच पाचव्या क्रमांकाला रोख रक्कम 2 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येकी 1 हजार रुपये व चषक अशी पाच उत्तेजनार्थ बक्षीसे दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी वेदांत कंटक (8329775531), हर्ष ढवळे (9730817227) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
––