सोनाळे गावामध्ये उत्साहात गौरी विसर्जन
अरविंद बेंडगा,
जिल्हा प्रतिनिधी,पालघर
7798185755
सोनाळे : – श्री महालक्ष्मी मातोच्या पायथ्याशी वसलेल्या सोनाळे (खुबरोखपाडा) गावात यंदाही गौरी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दि. 01 सप्टेंबर रोजी आदिवासी परंपरेनुसार गवूर स्थापना करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने प्रत्येक घरातील महिलांनी गौरीचे पूजन करून चालवल्या. रात्री एकत्र येऊन गौरी नाच व तारपा नृत्याचे कार्यक्रम रंगले.
गावात दोन दिवस पारंपरिक गवूर उत्सव साजरा करण्यात आला. दि. 03 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात तसेच डीजेच्या तालावर महिलावर्ग आणि पुरुषवर्गाने गौरीचे गाणे गात व टाळ्या वाजवत पारंपरिक गौरी नृत्य व तारपा नाच सादर केला.
गौरी विसर्जनाची मिरवणूक गावभर उत्साहात पार पडली. महिलावर्गाचा मोठा सहभाग आणि पुरुष मंडळींचे सहकार्य यामुळे कार्यक्रमाला रंगत आली. गावकऱ्यांनी परंपरा जपत एकोप्याने उत्सव साजरा करून एक वेगळेच वातावरण निर्माण केले.
आयोजक म्हणून सोनाळे खुबरोखपाडा येथील महिला वर्ग, पुरुष मंडळी व ग्रामस्थ यांचे विशेष योगदान लाभले.