जिल्हास्तरीय स्वच्छ भारत समर इंटरशिप पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
जिल्हाधिकारी यांच्याहस्ते झाला सन्मान
केकतउमरा येथील नेहरू युवा मंडळाला प्रथम क्रमांक प्राप्त
विनायक सुर्वे प्रतिनीधी
वाशिम :- युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, नेहरू युवा केंद्र वाशिम द्वारा आयोजित जिल्हा स्तरीय स्वच्छ भारत समर इंटरशिप कार्यक्रम सन 2019-20 दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारत भर राबविण्यात आलेला हा उपक्रम वाशिम जिल्ह्यातील नेहरू युवा केंद्र वाशिम संलग्नित नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला.या मंडळाचे अध्यक्ष प्रविण पट्टेबहादुर,नेहरू युवा केंद्र वाशिम राष्ट्रीय स्वयंसेवक प्रदिप पट्टेबहादुर यांना दिनांक 1 ऑक्टोबर रोजी कोरोनाच्या काळात शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्याहस्ते व नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा समनव्यक सम्यक मेश्राम यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.या प्रथम पुरस्काराचे स्वरूप आकर्षक स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र,मेडल व 30000 हजार रुपये,असे आहे.
हा समर इंटरशिप पुरस्कार यासाठी दिला की,भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “स्वछता हीच सेवा” हा उपक्रम संपूर्ण देशात राबविण्यात आला होता.आणि त्यांनी जनतेला आवाहन केले होते की,आपण दररोज स्वच्छता अभियान राबविण्याची मोहीम हाती घेऊन स्वच्छता अभियान या कार्यात सहभागी होऊन देशसेवा करावी.यासाठी जिल्ह्यात पुरस्कार देखील ठेवले होते.या त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ केकतउमरा अध्यक्ष प्रविण पट्टेबहादुर,नेहरू युवा राष्ट्रीय स्वयंसेवक प्रदीप पट्टेबहादुर यांनी आपल्या मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी “स्वच्छता हीच सेवा” मोहीम राबविली होती.याबद्दल त्यांना हा समर इंटरशिप जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
या छोट्याखाणी कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र वाशिम राष्ट्रीय स्वयंसेवक मनोज भोयर,स्वयंसेवक रुपेश बाजड ,पत्रकार सुरेश गिरी,मंगेश पडघान उपस्थित होते.या स्वयंसेवी संस्था, मंडळांनी केलेल्या कार्याबद्दल व त्यांच्या यशाबद्दल जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक व नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समनव्यक सम्यक मेश्राम यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.