मध्यप्रदेशमध्ये सामुहिक बलात्कार पिडीतेचा तक्रार नोंदविली नाही; गळफास घेऊन आत्महत्या

पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी त्यांना मेडिकल तपासणी करण्यास सांगितले. पुढील दिवशी जेव्हा ते हा तपासणी अहवाल घेऊन पोलीस ठाण्यात गेले तेव्हा पोलिसांनी पिडितेच्या कुटुंबाला बसवून ठेवले. तसेच त्यांना सोडण्यासाठी पिडीतेकडेच पैशांची मागणी करण्यात आली.

 

नरसिंहपुर : मध्य प्रदेशच्या नरसिंहपुरमध्ये हाथरससारखाच प्रकार समोर आला आहे. येथील एका महिलेवर सामुहिक बलात्कार (Gang Rape with Dalit Woman) झाला. मात्र, चार दिवसांपासून प्रयत्न करूनही पोलिसांनी एफआय़आर दाखल करून घेतला नाही. कुटुंबासोबत रोज पिडीता पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत राहिली. उलट पोलिसांनी तिला शिवीगाळ करत पैसे मागितले. अखेर पिडीतेने गळफास घेऊन जीवन संपविल्याचा (Rape Victim Commits suicide) धक्कादायक प्रकार घडला आहे.

या प्रकरणाने वाद निर्माण होताच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सरकारने एएसपी आणि एसडीओपींची उचलबांगडी केली आहे. याशिवाय एफआयआर नोंदवून न घेणाऱ्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
28 सप्टेंबरचे हे प्रकरण आहे. रिछाई गावात राहणाऱी महिला शेतात चारा कापण्यासाठी गेली होती. तेव्हा शेजारी राहणाऱ्या तीन आरोपींनी शेतातच तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पिडीता आणि तिचे कुटुंबीय गोटिटोरिया आणि चिचली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी सारखे जात होते. मात्र, पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला नाही. पोलिसांच्या वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या पिडीतेने घरातच फास लावून घेतला.

पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी त्यांना मेडिकल तपासणी करण्यास सांगितले. पुढील दिवशी जेव्हा ते हा तपासणी अहवाल घेऊन पोलीस ठाण्यात गेले तेव्हा पोलिसांनी पिडितेच्या कुटुंबाला बसवून ठेवले. तसेच त्यांना सोडण्यासाठी पिडीतेकडेच पैशांची मागणी करण्यात आली. पिडितेच्या सासऱ्यांनी केलेल्या आरोपांनुसार पोलिसांनी तिला अश्लिल शिवीगाळ केली. तसेच आपल्या विरोधात 151 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री 9 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यातच कोंडून ठेवण्यात आले. पैसे घेतल्यानंतरच घरी पाठविण्यात आले. चार दिवस पोलीस आम्हाला भटकवत राहिले. यामुळे पिडीतेने कंटाळून आत्महत्या केली.

या प्रकरणाने उत्तर प्रदेशसारखी परिस्थिती दिसू लागताच शिवराज सिंहांनी शुक्रवारी रात्री उशिराने तत्काळ कारवाईचे आदेश दिले. दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांना हटविण्यात आले असून पोलीस ठाण्याच्या इनचार्जलाही अटक करण्यात आली आहे. सुट्टीवर गेलेल्या एसपींकडूनही स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here