लोहिया विद्यालयात महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
गोंदिया प्रतिनीधी
सौंदड :- लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,रामदेवबाबा अध्यापक विद्यालय,जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा तसेच लोहिया कॉन्व्हेंट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल,सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 2 ऑक्टोबर 2020 ला विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.जगदीश लोहिया, संस्थापक – अध्यक्ष लो.शिक्षण संस्था तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा.आ.न.घाटबांधे, संस्था उपाध्यक्ष, मा. शमीम अहमद, मा.पंकज लोहिया, संस्था सदस्य, मा.प्रल्हाद कोरे, मा. राजकुमार चांदेवार प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिंखलोंडे, पर्यवेक्षिका सौ .कल्पना काळे, हेडमिस्ट्रेस सयूंक्त जोशी उपस्थितीत होते.