वनवैभव शिक्षण मंडळातर्फे शाहीन भाभी हकीम यांनी विलास चेन्नूरी यांचे केले सत्कार! चेन्नूरी यांचे एमपीएससी परीक्षेत चमकदारी सहाय्यक वनसंरक्षक पदी विलास चेन्नूरी यांची निवड

51

वनवैभव शिक्षण मंडळातर्फे शाहीन भाभी हकीम यांनी विलास चेन्नूरी यांचे केले सत्कार!

चेन्नूरी यांचे एमपीएससी परीक्षेत चमकदारी

सहाय्यक वनसंरक्षक पदी विलास चेन्नूरी यांची निवड

*✒️अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335✒️*

*बबलू भैय्या हकीम यांनी मिठाई भरविले!*

*अहेरी*:-एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन वनखात्यातील सहाय्यक वनसंरक्षक पदी सिरोंचा तालुक्यातील पेरमिडा येथील विलास चेन्नूरी यांची निवड झाल्याने वनवैभव शिक्षण मंडळाच्या वतीने शाहीन भाभी हकीम यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह भेट देऊन विलास चेन्नूरी यांचे सत्कार करण्यात आले.

यावेळी वनवैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष बबलू भैय्या हकीम, माजी जि. प.अध्यक्षा आशाताई पोहणेकर उपस्थित होते.

बबलू भैय्या हकीम यांनी विलास चेन्नूरी यांचे अभिनंदन करून व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मिठाई भरविले.

याप्रसंगी विलास चेन्नूरी यांनी, शिक्षण हेच उज्जव भविष्याचे खरे माध्यम व जननी असून परिस्थिती हलाखीची व वातावरण प्रतिकूल असले तरी निरुत्साही व हार न मानता जिद्द, चिकाटी, प्रामाणिकतेच्या जोरावर यशाची उंची गाठता येते. युवकांनी उत्तम व दर्जेदार शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेत उतरले तर यश नक्कीच संपादन करता येते असे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण विलास चेन्नूरी यांनी बोलून दाखविले.

तर शाहीन भाभी हकीम यांनी, भौगोलिक व कौटुंबिक परिस्थिती बेताची असतांनाही विलास चेन्नूरी यांनी संपादन केलेले यश हे जिल्ह्यातील व प्रामुख्याने अहेरी उपविभागातील युवकांसाठी अभिमान व प्रेरणादायी असून सोयी-सुविधा, यंत्र-सामुग्री नसले तरी अभ्यास, चिकाटी, जिद्द मनात बाळगले तर यश आपोआप पदरात पडत असते हेच एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विलास चेन्नूरी यांच्या चमकदारी कामगिरीवरून प्रकर्षाने जाणवत असल्याचे शाहीन भाभी हकीम यांनी म्हटले.