स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे महात्मा गांधी तथा लालबहादुर शास्त्री जयंती सोहळा संपन्न कोवीड-19 मधील गावाचे 100 टक्के लसीकरण उदिदष्ट पुर्ण केल्याबददल डॉ. प्रियंका ब्राम्हणे व आरोग्य सेविका रंजना कोहपरे यांचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देवून ग्रामस्थांनी केला सत्कार.  ग्रामवासीय स्वच्छतादुत व कृषी मित्र यांचा प्रमाणपत्र देवून गौरव.

54

स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे महात्मा गांधी तथा लालबहादुर शास्त्री जयंती सोहळा संपन्न

कोवीड-19 मधील गावाचे 100 टक्के लसीकरण उदिदष्ट पुर्ण केल्याबददल डॉ. प्रियंका ब्राम्हणे व आरोग्य सेविका रंजना कोहपरे यांचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देवून ग्रामस्थांनी केला सत्कार.

 ग्रामवासीय स्वच्छतादुत व कृषी मित्र यांचा प्रमाणपत्र देवून गौरव.

✍️संतोष मेश्राम✍️

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

( ग्रामीण )-9923497800

राजुरा सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की : राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथील ग्राम पंचायतच्या वतीने 2 ऑक्टोंबर 2021 ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी तर स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची 117 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. सन 2012 मध्ये स्वच्छतेचा घेतलेला संकल्प याला आज 9 वर्ष पुर्ण झाले. संकल्प काय तर दररोज पहाटे 4:30 ते 6:30 दोन तासात संपूर्ण गावाची सातत्याने स्वच्छता करुन एक आदर्श निर्माण केले. ”आदर्शाचं विकास मॉडेल” असलेल्या स्मार्ट मंगी (बु) गावात स्वच्छ भारत अभियान व पर्यावरण संरक्षण माझी वसुंधरा उपक्रमाची अंमलबजावणी जोरात सुरु आहे. महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांचे जयंतीचे औचित्य साधुन ग्रामस्थांनी व ग्राम पंचायत यांनी मिळून कोवीड-19 मधील लसीकरणाचे 100 टक्के उदिदष्टपुर्ण केल्याबददल डॉ. प्रियंका ब्राम्हणे,सी.एच.ओ. आणि कु. रंजना कोहपरे यांचा शाल, श्रीफळ तथा प्रमाणपत्र देवून नागरी सत्कार करण्यात आला. तर कृषी विभागात मोलाचे कार्य करणारे गावातील कृषी मित्र शंकर तोडासे यांचा कृषी विभागाकडून प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. सोबतच ग्रामवासीय स्वच्छतादुत म्हणुन जबाबदारी पार पाडणारे ग्रामस्थांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. याप्रसंगी राजुरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय परचाके यांनी मनोगतातून ग्रामस्थांच्या एकसंघतेच्या कार्याचे कौतुक केले तर तालुका कृषी अधिकारी विठठल माकपल्ले यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

सर्व प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांचे प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजुरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय परचाके हे होते तर कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणुन तालुका कृषी अधिकारी विठठल माकपल्ले, मंडळ अधिकारी सचिन चव्हाण, अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंबादास जाधव, उपाध्यक्ष सुमनाई येमुलवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मोहपतराव कुळमेथे, पोलीस पाटील व्यंकटराव मुंडे, माजी जि.प. सदस्य भिमरावजी पुसाम, माजी सरपंच रसिकाताई पेंदोर, माजी सरपंच सोनबती मडावी, माजी उपसरपंच वासुदेवजी चापले तसेच ग्राम पंचायतीचे सचिव गजानन वंजारे, मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे, ग्रा.प. माजी सदस्य शंकर तोडासे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन विषय शिक्षक सुधीर झाडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शिक्षक मारोती चापले यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक श्रीनिवास गोरे, अंगणवाडी सेविका शारदाताई क्षिरसागर, भिमबाई कन्नाके तसेच ग्राम पंचायत कर्मचारी नितीन मरस्कोल्हे, चरणदास चिलकुलवार, दिनेश राठोड, बालाजी मुंडे तथा गावातील युवक मंडळ आणि अनुसयाबाई कुळसंगे व फुलाबाई मडावी यांनी मोलाचे सहकार्य केले.