एम.पी बॉर्डर बिजासनी घाटात ब्रेक फेल झाल्यामुळे एकाच कुटुंबातील 10 जण जखमी त्यापैकी 4 जणांची परिस्थिती चिंताजनक.

नामदेव धनगर
धुळे जिल्हा प्रतिनिधी
मो.नं.9623754549
धुळे शिरपूर:- सविस्तर वृत्त आगरा बॉम्बे राष्ट्रीय महामार्गावरील इंदौर कडून मुंबईकडे जाणारा ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे धुळ्याहून इंदौर कडे जाणाऱ्या क्रुझरला धडक दिल्याने क्रुझर पलटी झाली असून एकूण दहा जण जखमी झाले आहेत दहा पैकी चार जणांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे वृत्त कळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी मुंबई आग्रा महामार्गावर इंदौर कडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे ती विरुद्ध दिशेला जाऊन धुळेकडून इंदौर कडे जाणारी गाडी क्रमांक एम एच 18 ए जे 90 15 या क्रूझर गाडीला धडक दिल्यामुळे ती पलटी झाली व यातील दहा प्रवासी जखमी झाले त्यांना प्राथमिक उपचारासाठी मध्य प्रदेशातील सेंधवा येथे पाठवण्यात आले त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते मध्य प्रदेशातील मगर खेडी येथे नातलगाच्या ठिकाणी कार्यक्रमास जात होते क्रुझर चालक मनोज जयस्वाल यांनी माहिती एकाच घरातील कुटुंब असल्याची माहिती दिलीत्या दहा जणांना पैकी चार जणांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळाली घटनास्थळी रुग्णवाहिकेला फोन केला असता ती लवकर पोहोचली नसल्या कारणाने मध्यप्रदेशातील पोलिसांनी आपल्याच वाहनात सर्व रुग्णांना घेऊन मध्य प्रदेशातील सेंधवा येथे उपचारासाठी दाखल केले बिजासनी घाट हा मध्य प्रदेश व महाराष्ट्र बॉर्डर वर असल्यामुळें रुग्णवाहिका कधीही लवकर पोहोचत नाही म्हणून नागरिकांनी त्यांच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे.