नेफडोच्या नागपूर विभाग अध्यक्षपदी बादल बेले यांची निवड.
– नागपूर विभाग सचिवपदी इंजि. घनश्याम निखाडे तर उपाध्यक्षपदी यशवंत उपरीकर.
– नेफडो नागपूर विभागाची कार्यकारणी जाहीर.

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा:- सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत द्वारे नागपूर विभागाची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्यस्तरावरील पदाधिकारी यांनी नुकतीच नागपूर विभाग कार्यकारणी जाहीर केली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या तालुक्यातील रहवासी बादल बेले यांची नागपूर विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील शेडेपार येथील रहवासी इंजि. घनश्याम शिवचरण निखाडे यांची नागपूर विभाग सचिव पदी व भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील रहवासी यशवंत उपरीकर यांची नागपूर विभाग उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण व मानवता विकास करिता केलेल्या कामगिरीची दखल घेऊन तसेच संस्थेच्या विविध उपक्रमात सहभागी होऊन समाज उपयोगी कार्य उत्तम प्रकारे करीत असल्याची वरिष्ठ पदाधिकारी यांनी दखल घेऊन या नियुक्त्या केलेल्या आहेत. नेफडोच्या अंतर्गत पर्यावरणस्नेही या नात्याने पर्यावरण संवर्धनाचे निस्वार्थ प्रामाणिक कार्य करत राहाल या अपेक्षेने आपली निवड करण्यात आल्याबद्दल नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राष्ट्रीय मार्गदर्शक अण्णा हजारे, राष्ट्रीय सल्लागार लताश्री वडनेरे, राजेंद्र नागवडे, हरीविजय देशमुख, ब्रँड ॲम्बेसिडर सिनेअभिनेते जयराज नायर, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, राष्ट्रीय उपाध्यक्ष कमल सावंत, राष्ट्रीय सचिव सचिन वाघ, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दीपक भवर, उपाध्यक्ष प्रकाश कदम, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा नीता लांडे आदीसह नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर या जिल्ह्यातील सर्व पादाधिकारी, सभासदानी अभिनंदन केले आहे.
नेफडो या संस्थेमार्फत विविध क्षेत्रातील गरजूना मदत केली जाते. पर्यावरण संवर्धाना सोबतच मानवता विकासाचे कार्य या संस्थेमार्फत होत असून संपूर्ण महाराष्ट्रसह, भारत व बाहेर देशातही या संस्थेचे सभासद असून तिथे उपक्रम, कार्यक्रम राबविले जातात.