सांगली नागरी सुविधेसाठी बोंब मारो आंदोलन करणार: मांतेशराव कांबळे वंचित बहुजन युवक आघाडी.
✒️ संजय कांबळे ✒️
सांगली जिल्हा प्रतिनिधी
9890093862
सांगली:- मु.पो. इनाम धामणी तालुका मिरज येथील राजाराम बापू मागासवर्गीय गृह निर्माण संस्था, येथील नागरिक दैनंदिन नागरी सुविधा पासून वंचित आहेत. येतील गटारीच्या काम सुरू करण्यासाठी दीड वर्षाच्या पूर्वी कामाची वर्क ऑर्डर संबंधित ठेकेदाराना दिली आहे, परंतु गेल्या दीड वर्षापासून कामाचे वर्क ऑर्डर येऊन सुद्धा काम अर्धवट सोडून बिल मात्र काढत आहे. पण तेथील गटारीचे काम अर्धवट केल्याने स्टील सळ्या बाहेर तसाच राहिल्यामुळे तेथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. तसेच गटारीचे काम अर्धवट पडल्याने सदर भागात दुर्गंधि पसरली आहे. त्यांमुळे डासाचे प्रभाव वाढला असल्याने डेंगू, मलेरिया, चिकन गुनिया या रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्या परिसरात राहात असणारे बरेचसे नागरिक हा आजाराने त्रासलेले आहेत. त्यांमुळे तेथील लोकांना ग्राम पंचायत यांच्या चुकीच्या धोरणा मुळे त्रास होत आहे.
काही दिवसा अगोदर महादेव रामा कांबळे ही व्यक्ती त्या गटारी मध्ये पडल्याने पाच ते सहा टाके पडलेले आहेत. त्यांना औषध उपचार करण्यासाठी लाखो रूपये खर्च करावे लागले आहेत. असे असताना देखील ठेकेदार दुर्लक्षित करत आहेत म्हणून ग्रामपंचायत इनाम धामणी येथे ग्राम विकास अधिकारी हे अनुपस्थित असताना तेथील क्लार्क लक्ष्मण पुजारी यांना निवेदन देण्यात आले. येणाऱ्या आठ दिवसांमध्ये गटारीचे काम सुरू करून ठेकेदावर कारवाई करा. अन्यता वंचित बहुजन युवक आघाडी यांच्या वतीने, इनाम धामणीतील नागरिक यांच्या दैनंदिन नागरी सुविधा व न्याय हक्कासाठी “ग्रामपंचायत इनाम धामणी” आवारात बोंब मारो आंदोलन करण्याचा इशारा युवक आघाडीचे, मानतेशराव कांबळे यांनी दिला आहे. यावेळी, किरण कांबळे, कृष्णा दहीवडे, दीपक कांबळे, रमेश कांबळे, सुनील कांबळे, पप्पू अनिल कांबळे, परशुराम शिंगे, संग्राम कांबळे यांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.