जागतिक शांततेकरिता गांधी विचारांची गरज – डॉ. रवींद्र हजारे

मारोती कांबळे

गडचिरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

मो.नं.9405720593

अहेरी जगातील हल्लीची परिस्थिती पाहता जगात आतंकवाद, हिंसाचार यांचा धमाकूळ माजलेला असून या परिस्थितीतून गांधीजींच्या सत्य व अहिंसेचे विचार मार्ग काढू शकतात असे प्रतिपादन डॉ. आर. डी. हजारे यांनी प्रमुख वक्ते म्हणून आपल्या भाषणातून केले 

अहेरी स्थानिक श्री. शंकरराव बेझलवार कला व वाणिज्य महाविद्यालय अहेरी, येथे रासेयो व एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती या कार्यक्रमात ते बोलत होते.

महाविद्यालयातील रासेयो व एनसीसी विभागाच्या वतीने 153 व्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. नागसेन मेश्राम हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पी. जी लाभसेटवार व प्रा. प्रभाकर घोडेस्वार हे उपस्थित होते.

प्रा. प्रभाकर घोडेस्वार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रमाचे औचित्य प्रतिपादन केले तसेच डॉ. पी. जी लाभसेटवार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचे राष्ट्र उभारणीमध्ये काय योगदान होते याविषयी विस्तृत विवेचन केले. याप्रसंगी राजेश उसेंडी, सुनील जिलापेली व प्रवीण मोरला या विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.

डॉ. रवींद्र हजारे यांनी आपल्या प्रमुख वक्तव्यामधून राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण व प्रेरणादायी प्रसंगांमधून आज जगात त्यांच्या विचारांची कशी गरज आहे याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन निखिल मादासवार यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. वैष्णवी खोबरे हिने केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. चंद्रशेखर गौरकर, प्रा. संभाशिव लांडे, प्रा. गजानन जंगमवार, प्रा. दीपक उत्तरवार, प्रा. मंगला बनसोड, प्रा. अमोल शंभरकर, प्रा. गौरव तेलंग, प्रा. नामदेव पेंदाम, प्रा. सुहास मेश्राम व विद्यार्थी परिषदेचे संपूर्ण सदस्य, महाविद्यालयाचे इतर विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here