एन. जे. पटेल महाविद्यालय, मोहाडी तर्फे श्रमदान

एन. जे. पटेल महाविद्यालय, मोहाडी तर्फे श्रमदान

एन. जे. पटेल महाविद्यालय, मोहाडी तर्फे श्रमदान

✍️मनोज एल खोब्रागडे✍️
सह संपादक दैनिक मीडिया वार्ता
न्युज मो.नंबर- 8208166961

मोहाडी : -स्थानिक एन. जे. पटेल महाविद्यालय, मोहाडी येथील राष्ट्रीय सेवा योजना पथका द्वारे म. गांधी यांच्या जयंती निमित्त आयोजित स्वच्छता सप्ताह अंतर्गत मोहाडी बस स्थानक परिसरात श्रमदान करण्यात आले. दरवर्षी म. गांधी यांच्या जयंती निमित्त स्वच्छता सप्ताह साजरा केल्या जातो . यावर्षी भारत सरकारच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमे अंतर्गत ही सामाजिक बांधिलकी जोपासण्याची जबाबदारी पार पाडायची होती. या अनुशंगाने राष्ट्रीय सेवा योजना पथका चे समन्वयक प्रा. डॉ. एम. बी. भैसारे यांच्या नेतृत्वात व प्राचार्य डॉ. एस. डी. पवार यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात आली. या साठी बस स्थानक मोहाडी या परिसरची निवड करण्यात आली. बस स्थानक प्रमुख श्री संजय वानखेडे यांच्या सहकार्याने ही मोहीम पार पडण्यात आली. यामध्ये प्रा. डॉ. वानखेडे, सिंगञ्जुडे मॅडम, श्री डी. टी. डोंगरे, श्री अभय राखडे यांच्या सोबत जवळपास ५० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here