कार्लेखिंड येथे जगदंबा प्रतिष्ठान पेडकपाडा कार्ले च्या वतीने वृक्षरोपण

305
कार्लेखिंड येथे जगदंबा प्रतिष्ठान पेडकपाडा कार्ले च्या वतीने वृक्षरोपण

कार्लेखिंड येथे जगदंबा प्रतिष्ठान पेडकपाडा कार्ले च्या वतीने वृक्षरोपण

जगदंबादेवी मंदिर परिसरात औषधी वृक्ष लागवड

कार्लेखिंड येथे जगदंबा प्रतिष्ठान पेडकपाडा कार्ले च्या वतीने वृक्षरोपण

अलिबाग (प्रतिनिधी) जगदंबा प्रतिष्ठान पेडकपाडा कार्ले तर्फे नवरात्र उत्सवानिमित्त कार्लेखिंड येथील जागृत देवस्थान म्हणून व नवसाला पावणारी जगदंबा देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने जगदंबा प्रतिष्ठान च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज वृक्ष लागवड करण्यात आली.
या वृक्ष लागवडीमध्ये बेल, शमी,पळस,कडुलिंब,गुलमोहर,बदाम अशा औषधी रोपांची लागवड करण्यात आली. समाजामध्ये वाढते प्रदूषण टाळावे व देवीच्या मंदिरासमोर परिसर सुशोभित राहावे हे उद्दिष्ट समोर ठेऊन प्रतिष्ठानच्या वतीने ही वृक्ष लागवड करण्यात आली असल्याचे जगदंबा प्रतिष्ठान पेडकपाडा कार्ले चे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी सांगितले.
रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाउंडेशन व प्रेस संपादक पत्रकार संघ रायगड चे अध्यक्ष पत्रकार ॲड .रत्नाकर पाटील यांच्या हस्ते वृक्ष लावून वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली .तसेच जगदंबा प्रतिष्ठान पेडकपाडा कार्ले चेअध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्यक्ष दिलीप जाधव, सचिव शरद पाटील खजिनदार दयानंद पाटील,सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील यांनीही वृक्ष लागवड केली.
यावेळी विश्वस्त मंडळाचे सदस्य सचिन पाटील, प्रकाश पाटील, मच्छिंद्र पाटील,रंगनाथ पाटील, विकास पाटील, प्रकाश पाटील,केतन घरत, सत्यवान घरत, कमलाकर घरत, निकेश पाटील, प्रदीप जाधव, संदीप जाधव, सतीश जाधव, सदस्या सुलोचना जाधव, श्वेता पाटील, सुवर्ण मानकर, विजया पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.