वर्धा जिल्हा सलुन ब्यूटी पार्लर असोशियेशन तर्फे संत नगाजी महाराज पुण्यतिथी साजरी.
मुकेश चौधरी प्रतीनिधी
हिंगणघाट:- तालूक्यातील वडनेर येथे सलून (ब्यूटी) पार्लर असोशियेशन तर्फे नाभीक समाजाचे आराध्य देवत. आपल्या सेवा कार्यातुन समाजाला एक नवी दिशा देणारे, महान संत नगाजी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
वडनेर येथील माता भवानी मंदिर परीसरात नाभीक समाजाचे आराध्य देवत श्री. संत नगाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वर्धा जिल्हा सलून (ब्यूटी) पार्लर असोसिएशनचे जिल्हा संघटक जिवन ऊरकडे आणि अमित चव्हाण उपस्थीत होते.
या कार्यक्रमाला यशश्वी करण्याकरिता वडनरचे ग्रामीण अध्यक्ष अमर कडुकर, उपाध्यक्ष मदन जाभुलकर, सचिव प्रशांत चौधरी, निलेश कडु, मोहन चौधरी उमेश नक्षिने, नगाजी कडवे, शिवम वाटकर, सचिन क्षीरसागर, प्रशांत हिवरकर, अमोल नक्षीने, स्वप्निल माडवकर, अमोल साखरकर, अमर चावके मोहन चौधरी यांनी यशस्वी केले.