लहान बहिणीच्या हातात युवक काँग्रेसचं स्टेरींग ?
✍️मनोज खोब्रागडे✍️
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
8208166961
चंद्रपूर:- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे मावळते अध्यक्ष सत्यजीत तांबे हे आपल्या उपक्रमशील नेतृत्वासाठी महाराष्ट्रात ओळखले जातात.त्यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने राज्यात केवळ आंदोलनेच नाही तर युवकांसाठी ठोस कार्यक्रम राबविले ज्याद्वारे विकासाभिमुख नेते आणि कार्यकर्ते घडत गेले.
यंदाची कार्यकारिणी विशेष चर्चेत राहिली ती युवतींच्या लक्षणीय सहभागामुळे. सत्यजीत तांबे यांनी नुसती संधीच नाही तर युवतींसाठी सुरक्षित आणि लोकशाहीभिमुख वातावरण संघटनेत निर्माण केले, ज्यामुळे युवतींना देखील राजकारणाची आवड निर्माण झाली. त्यांच्यातील सुप्त गुणांना आणि क्षमताना मिळालेल्या व्यासपीठामुळे त्या राज्यभर त्यांच्या कामाचा ठसा उमटवू शकल्या.
अशी बरीच नावे घेण्यासारखी आहेत. शिवानी वडेट्टीवार, ऋषिका राका, करीना झेवियर, कल्याणी रांगोळे, कल्याणी मानगावे, अश्विनी आहेर, नेहा निकोसे, डॉ. वैष्णवी किराड, स्नेहा पाटील, विजयलक्ष्मी घाग, गायत्री सेन यासह अनेक उदाहरणे देता येतील. युवतींचे संघटन वाढविण्यासाठी सत्यजीत तांबे यांनी 33% युवतींना संघटनेत स्थान देत स्वतंत्र युवती विभाग सुरू केला. त्याद्वारे युवती युवक काँग्रेस सोबतच त्यांच्या देखील विविध कार्यक्रम व उपक्रम घेतले.
मैं भी इंदिरा, आधी आबादी पुरा हक, सावित्रीच्या लेकी, रक्षाबंधन निमित्त करोना योध्याना राखी बांधून मनोबल उंचावणे असो वा महिला सुरक्षा वा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचे कार्यक्रम घेणे असेल. सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपक्रम युवती काँग्रेसने घेतले. या सर्व उपक्रमात आणि विविध जनआंदोलनात पुढे असणारे नाव म्हणजे शिवानी वडेट्टीवार.
उपजतच नेतृत्व गुण असल्याने प्रत्येक काम उत्कृष्ठ आणि सर्वांना सामावून घेऊन कसे करता येईल यावर शिवानी वडेट्टीवार यांचा विशेष भर असतो. समाजातील सर्व जातीधर्माच्या युवकांना एकत्र घेत नेतृत्व करण्याची शिवानी वडेट्टीवार यांचे जे राजकारण आहे त्यामुळे अल्पावधीतच त्यांना मानणारा एक युवा वर्ग तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या पहिल्या अध्यक्षा म्हणून शिवानी वडेट्टीवार निवडून आल्या तर त्यांच्याकडून युवकांना आणि युवतींना मोठ्या अपेक्षा असतील आणि शिवानी वडेट्टीवार यांचा आजवरचा राजकारणाचा आवाका बघता त्या या अपेक्षांना खऱ्या उतरतील अशी अपेक्षा करण्यास हरकत नसावी. अगदी सत्यजीत तांबे याच्याच भाषेत सांगायचं झालं तर शिवानी वडेट्टीवार ह्या अत्यंत मेहनती,विचारधारेशी एकनिष्ठ आणि समर्पित असलेलं नेतृत्व आहे, त्यामुळे सत्यजीत तांबे यांना आपली छोटी बहीण हिच्या हातात महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे स्टेरिंग आलेले बघताना आनंद होईल हे मात्र खरे.