नागपूर-हैदराबाद महामार्गावर अष्टविनायक ट्रॅवल्स आदळून पलटी; दोन ठार, १५ जखमी

52

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

वर्धा : ०३/११/२१ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगात असलेली ट्रॅवल्स आदळून २ जण जागीच ठार तर, १५ जण गंभीररित्या जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.
नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील आजंती शिवारात पांढरकवडावरून मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रवासी घेऊन नागपूरकडे धरधाव वेगाने निघालेली  ट्रॅव्हल्स क्रमांक (एम ए २९ एम ८४५४) धडकून पलटी झाली. ट्रॅवल भरधाव वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले वाहन संतुलन बिघडले व ते जाऊन धडकले. हा अपघात इतका भीषण होता की यात दोनजण जागीच ठार झाले तर १५ जण गंभीररित्या जखमी झाले.  या ट्रॅव्हल्समधून २० ते २२ प्रवासी पांढरकवडावरून दिवाळीसाठी मध्य प्रदेश येथे आपल्या गावाकडे परत जात असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघाताची नोंद हिंगणघाट पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.