आघाडी सरकारमुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात-डॉ.मंगेश गुलवाडे
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे राज्यसरकार विरोधात आंदोलन
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
8208166961
चंद्रपूर : -भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आज 2 नोव्हेंबर ला राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेसाठी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.त्या प्रसंगी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली व त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले ती नुकसानभरपाई न देता शेतकऱ्यांना भूलथापा देण्याचे काम राज्यातील आघाडी सरकार करीत आहे त्यांच्या या दडपशाहीमुळे शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी सारखा मोठा सण अंधारात जाईल या सरकारचा आम्ही भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने निषेध नोंदवितो असे त्यांनी यावेळी सांगितले तसेच दिव्यांची रोषणाई करून निषेध करण्यात आला सदर आंदोलनात महामंत्री रविंद्र गुरनुले,किसान मोर्चा महानगर अध्यक्ष रवींद्र चहारे,भाजपा उपाध्यक्ष रामपाल सिंग,अरुण तिखे,मनपा स्थायी समिती सभापती संदीप आवारी,सभागृह नेते देवानंद वाढई,भाजयुमो प्रदेश सचिव अनिल डोंगरे,मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार,रवी लोणकर, भाजपा सचिव प्रमोद शास्त्रकार, राजेंद्र खांडेकर,रामकुमार आक्कापल्लीवार,चंदन पाल,चांदभाई पाशा,एड.सारिका संदूरकर,धनराज कोवे,बंगाली आघाडी अध्यक्ष डॉ.दीपक भट्टाचार्य,रुद्रनारायण तिवारी,हनुमान काकडे,अतुल पोहाणे,संजय गिलबिले,गौतम निमगडे, बाजार मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष गणेश रामगुंडावार,बंडू गौरकार, रितेश वर्मा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती