सावनेर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामुहिक बुध्द वंदनेचे आयोजन.

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी. मो.नं-9822724136
सावनेर-03 डिसेंबर 2021 महामानव परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त युवक जागृती मंडळाच्या वतीने 6 डिंसेबर 2021 ला सकाळी 10 वा.बस स्थानक जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला तसेच महामानवाच्या प्रतीमेला विनम्र अभिवादन व आदरांजली वाहुन सामुहिक बुद्ध वंदनेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते रामराव मोवाडे राहतील व यावेळी न.प.उपाध्यक्ष अँड अरविंद लोधी,पत्रकार सुधाकर बागडे,माजी शिवसेना तालुकाप्रमुख उत्तमराव कापसे,विद्या विहार संस्थेचे संस्थापक सचीव प्रा. साहेबराव विरखरे प्रामुख्याने उपस्थित राहतील.
कृपया उपरोक्त कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवक जागृती मंडळाचे सचिव विक्की शेंडे यांनी केले आहे.
कृपया बाबासाहेबांच्या पासपोर्ट फोटो लावणे