छायाचित्र मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षणाला मुदतवाढ मतदार यादीत नोंद नसलेल्या व्यक्तींनी वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा : - जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आवाहन
छायाचित्र मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षणाला मुदतवाढ मतदार यादीत नोंद नसलेल्या व्यक्तींनी वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा : - जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आवाहन

छायाचित्र मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षणाला मुदतवाढ
मतदार यादीत नोंद नसलेल्या व्यक्तींनी वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा : – जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आवाहन

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्यूरो चीफ
9860020016

अमरावती, दि. 1 : भारत निवडणूक आयोगाकडून दि. 1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला असून, त्याअंतर्गत दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीला 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन नवतरूणांनी मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार, दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधी 5 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. दावे व हरकती निकालात काढण्याचा कालावधी 20 डिसेंबरपर्यंत, तर मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार आहे.

या वाढीव मुदतीचा नवतरूणांनी अर्थात ज्यांना 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होत आहेत, अशा पात्र तरूणांनी लाभ घेऊन मतदार म्हणून नोंद करावी. पात्र असूनही मतदार यादीत नाव नसलेल्यांनी तशी नोंद करून घ्यावी. त्याचप्रमाणे, स्थानांतरित मतदार, निधन झालेल्या मतदारांसंदर्भात त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना देऊन नावे वगळण्यासाठी सहकार्य करावे. मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी आपले छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांकडे किंवा मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांचे कार्यालयात जमा करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here