घर माझं स्वर्ग से सुंदर

अंकुश शिंगाडे

नागपूर

मो: ९३७३३५९४५०

आपलं घर. आपल्या घराला कोणी वाईट म्हणत असतं. मी वाईट म्हणतांना पाहिलं आहे. कोणी म्हणतात की प्रत्येकाला दुस-याचा पती, दुस-याची पत्नी, दुस-याची मालमत्ता, दुस-याच्या घरचं जेवन, तसेच दुस-याची इमारत ह्या गोष्टी आपल्याला आवडतात. आपली पत्नी किंवा आपला पती कितीही चांगला असला तरी तो आपल्याला आवडत नाही. आपली इमारत कितीही चांगली असली तरी ती आपल्याला आवडत नाही तसेच आपल्या घरचं रोज चांगलं बनणारं जेवन कितीही चांगलं असलं तरी ते आपल्याला आवडत नाही.

         आपण दुस-याच्या पतीला वा पत्नीला चांगलं म्हणत अससतो आणि आपल्या घरच्या पती वा पत्नीला वाईट म्हणत असतो. जर आपण आपल्या घरच्या पत्नीला वाईट म्हटलं तर त्यामुळंं बराच मोठा फरक पडत असतो. त्यामुळं आपल्या घरची लक्ष्मी निराश होत असते. घरी पैसा येणं बंद होतं. कारण आपली पत्नी ही साक्षात लक्ष्मीचं रुप आहे आणि जर पतीला वाईट म्हटलं तर तो पती सतत वाईट म्हणत असल्यानं पुढे जावून वाईटच संगतीत लागतो. त्यामुळं त्याला दारु, जुगार, सट्टा, अफू, गांजा, चरस यांची सवय जडते. मग तो वाममार्गाला लागतो. 

          समजा स्रियांना नटणं आवडतं आणि अशावेळी त्या नटणा-या महिलेला जर म्हटलं की मोठा चांगलाच दिसते तुझा अवतार तर तिचा जमदग्नी अवतार झाल्याशिवाय राहात नाही. जमदग्नी याचा अर्थ अति राग येणे असा होणे असा होतो. असं काही म्हटल्यास तिला ते आवडत नाही. ती आपली अशी खरडपट्टी काढते की आपण पुन्हा बोलण्याच्या तालातच राहात नाही. तिला तसं वाटतं. तीच गोष्ट घराबाबत आहे. घराबाबत सांगायचं झाल्यास आपलं घर……मग ते कितीही चांगलं असलं तरी त्याला चांगले म्हणणारे लोक अलीकडे दिसत नाहीत. ते दुस-याच्या घराला चांगलं म्हणतात. परंतू तसं म्हणणं चुकीचं आहे. कारण त्या आपल्या तसे म्हणण्यानं आपलं घर निराश होत असतं. ते पदोपदी शाप देत असतं. त्यामुळं आपल्या घरात आनंद दिसत नाही. आनंद राहात नाही. नेहमी चिडचीडतेची भावना वाढीस लागते. त्यातूनच कलह, सततची भांडणमं उद्भवत असतात.  

          आपलं घर…….आपलं घर स्वर्गाहूनही सुंदर असतं. त्याला दोष देवू नये. ज्याप्रमाणे आपण आपल्या पत्नीला चांगले न म्हणता दुस-याच्या पत्नीला चांगले म्हटले तर तिला राग येतो. तसंच घराचेही आहे. आपण दुस-याच्या घराला चांगलं म्हटल्यास आपल्याही घराला राग येत असतो. तेच जेवणाबाबत आहे. म्हणतात की जेवन बनवितांना चांगलं मन ठेवून जेवन बनवावं. कारण त्यांचे भाव त्या जेवनात उतरतात. त्यामुळं जेवन अतिशय रुचकर लागत असतं. जर ते जेवन बनवितांना जेवन बनविणारा व्यक्ती आजारी असेल तर जेवन करणारेही व्यक्ती आजारी होवू शकतात हा निसर्गनियम नाही. ते शास्रीय कारण आहे. काही काही संसर्गजन्य रोगाचे जंतू ते जेवन बनवीत असतांना जेवणातून दुस-याच्या शरीरात जाण्याची शक्यता असते. यातूनच असं सांगता येईल की जर जेवन बनविणारा व्यक्ती जर वेदना भोगणारा असेल, तर त्या वेदनेचे भावही जेवन बनवितांना त्या जेवनात उतरत असतात. म्हणूनच कधी कधी विवाहसमारंभातील जेवन सर्वच प्रकारचे मसाले टाकूनही सुग्रास व सात्वीक बनत नाही. कारण कधीकधी ते जेवन बननविणा-या व्यक्तीचं भांडण घरी वा इतर कोणाशी झालेलं असतं ही शक्यता नाकारता येत नाही. हाच वेदनादायी नियम लावून घरची लक्ष्मी समजणारी स्री जर रजस्वाला असेल, तर तिला काही ठिकाणी स्वयंपाक करु देत नाही. कारण रजस्व अवस्थेत तिला पीडा होत असते. ती वेदना जेवन बनवितांना त्या जेवनात उतरुन ते जेवन सुग्रास होण्याऐवजी ते जेवन विषाक्त होण्याची शक्यता असते. याच अनुषंगानं असंही मानलं जातं की गरोदरपणातही महिलांना जेवन बनवायला लावू नये किंवा जड कामे करायला लावू नये. कारण त्याचा परिणाम जेवनावर तर होतोच. प्रसंगी तिच्या पोटातील बाळावरही होतो. कारण जेव्हा एखादी महिला गरोदर असते. तेव्हा तिला गरोदर असतांना अतिशय वेदना होत असतात. अशा स्रिला जेवन बनवायला लावल्यास त्याच वेदनादायी अवस्थेत तेच वेदनादायी बनविलेलं अन्न तिच्याच पोटात गेल्यानंं तिच्याच पोटातील बाळाला तेच अन्न नाळ रुपातही मिळत असतं. त्याचा परिणाम तेच अन्न तिच्या पोटातील बाळानं प्राशन केल्यानं त्या गर्भावरही तेच परिणाम होत असतात. त्यामुळं काही जणांचं बाळ सुसंस्कारीत जन्म घेत नसतं.

            पुर्वी संयुक्त कुटूंबपद्धती होती. त्यावेळी घरात भरपूर सदस्य होते. त्यावेळी घरात कामं करणारे भरपूर लोकं असायचे. त्यामुळं जर कुटूंबात कोणी गरोदर असेल किंवा कोणी आजारी असेल किंवा कोणी रजस्व अवस्थेत असेल, तर त्यांना जेवन बनवू देत नसत. कारण त्यांना वाटायचं की त्यामुळं अन्न दुषीत होतं. ते तशा अवस्थेत घरच्या सदस्यांना जेवन बनवू देत नसल्यानं व ते भाव अन्नात उतरु देत नसल्याने त्यावेळचे लोकं सुसंस्कारीत असायचे. गावात येणा-या मुली विवाहाद्वारे आल्यानंतर त्या मुली मानमरातबाने वागायच्या. त्यांंच्या डोक्यावरील पदर अजिबात पडायचा नाही. तसेच वडीलधारी माणसांसमोर त्यांची मान झुकलेलीच राहायची.

       अलीकडे काळ बदलला. त्यानुसार पाश्चात्य लोक देशात आले. त्यांच्या विचारसरणीची देवाणघेवाण झाली. त्यानुसारच संयुक्त कुटूंबपद्धती जावून त्याठिकाणी विभक्त कुटूंबपद्धती आली व काळ बदलला. मी माझी पत्नी व माझी मुलं एवढाच संसार सिमीत झाला. मग घरी एखादा आजारी पडल्यास वा कोणी रजस्व झाल्यास वा कोणी गरोदर असल्यास घरी वेगळं कोणी अन्न बनविणारा सदस्य उरला नाही. यातूननच समस्या निर्माण झाल्या. समस्या वाढायला लागल्या. लोकं आणखीनच आजारी राहू लागले. आणखीनच लोकं चिंतेत राहू लागले तसेच डिप्रेशन अवस्थेत जावू लागले. तसेच गरोदर नंतर पैदा होणारी मुलं ही सात्वीक पैदा झाली नाही. ती पिढी ही वडीलधारी मंडळींचा अपमान करणारी पैदा झाली. आज त्याचा परिणाम समाजावरही होत असून समाजात अशीच मुलं त्याच विषयुक्त जेवनाच्या प्राशनानं तयार होत आहे. ती मुलं बाहेर समाजात गुन्हेगा-या कपीत आहेत. कुठे बलात्कार करीत आहेत. तर कुठे भ्रष्टाचार करीत आहेत. मानमरातब तर आज अजिबात उरलेलाच नाही. कारण आजचं जेवन आजारी व्यक्ती, गरोदर व्यक्ती व रजस्व स्री बनवीत आहे.

           विशेष म्हणजे दुस-याची पत्नी किंवा पती, दुस-याची इमारत आणि दुस-याच्या घरचं जेवन आपल्याला का आवडते ते कळत नाही. ते आवडूही नये. आपली पत्नी कितीही वाईट का असेना, ती आवडायला हवी. आपला पती कितीही वाईट असला तरी तो आवडायला हवा, आपल्या घरचं जेवन कितीही खराब झालं असलं तरी ते आवडायला हवं. कारण ते जेव्हा आवडायला लागते, तेव्हाच घराला घरपण येत असतं. तसंच त्यासाठी विशेष सांगायचं म्हणजे आज पुन्हा एकदा संयुक्त कुटूंबपद्धती यावी. जेणेकरुन कुटूंबातील आजारी माणसाला, रजस्व स्रीला व गरोदर स्रीला स्वयंपाक बनवावा लागू नये की त्यातून विषयुक्त अन्नाची निर्मीती होईल व ते प्राशन करुन भावी पिढी बिघडेल.

           घर हे घरपण देणारं असावं. ते स्वर्गाहूनही सुंदर असावं. त्यासाठी असं दुस-याचा पती, पत्नी, इमारत अन्न याला चांगलं म्हणायला नको. आपल्याच वस्तूंना चांगलं म्हणावं. जेणेकरुन अशा आपल्या वागण्यातून लक्ष्मीमाता, अन्नपुर्णा आणि इतर देवता निराश होणार नाही. तसेच आपली उत्तरोत्तर भरभराट होईल. खरंच आपलं घर दुस-याच्या घरापेक्षा स्वर्ग से सुंदर असतं असं म्हणायला काही हरकत नाही. मात्र ते कसं बनवावं ते आपलं आपणच ठरवावं. कारण भविष्य आपल्याच हाती असतं. इतरांच्या नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here