ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण नक्कोच, हंसराज अहिर यांचे वक्तव्य खेदजनक : डॉ. अशोक जिवतोडे 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर,3 डिसेंबर: राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष हंसराज अहिर यांनी महाराष्ट्राने शिफारस केल्यास मराठ्यांना ओबीसीत स्थान देवू असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याबद्दल ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी निराशा दाखवून खंत व्यक्त केली.

माजी खासदार व देशाचे माजी मंत्री हंसराज अहिर हे ओबीसी मतदारांच्या भरोश्यावर उच्च पदावर गेले. आज त्यांना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षपद प्राप्त झाले. त्यांच्या कडून ओबीसी समाजाला मोठ्या अपेक्षा आहेत. इतके दिवस झाले, हंसराज अहिर हे ओबीसी समाजात वावरत आहेत. त्यांना ओबीसी समाजातील समस्यांची जाण आहे, तरी देखील त्यांचे हे वक्तव्य खेदजनक व संतापजनक आहे. या अगोदर ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी मराठ्यांचा ओबीसीत समावेश करू नये, याकरीता अनेक निवेदने, मोर्चा, धरणे, व विविध आंदोलने केली होती, याची जाण त्यांनी ठेवावी, असे डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.

ओबीसी समाजाचा तीव्र संताप लक्षात घेता व ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी खंत व्यक्त केल्यानंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष हंसराज अहिर यांनी खुलासा सादर केला. हंसराज अहिर म्हणाले, ओबीसी आयोगाचा अध्यक्ष म्हणून विद्यमान ओबीसी प्रवर्गातील जातींना कसलाही धक्का लागू देणार नाही. त्यांच्या संरक्षण करता मी आयोगाचा अध्यक्ष आहे अन्य कोणत्याही जाती ओबीसी मध्ये घेण्याचा अधिकार मला नाही, हे मी स्पष्ट करतो. आरक्षणाला कसलीही कपात होऊ देणार नाही त्यांचे संरक्षण व प्रगती करिता मी सदैव कटिबद्ध आहे, असे मराठा आरक्षणबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here