मावळ लोकसभा निवणुकीपूर्वीच विकसित होणार,या पाऊलवाटा मावळ विकासाकडे…
✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞
कर्जत : आजघडीला मावळ मतदार संघात अनेक कार्यकर्ते नेते आगामी काळात लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी सक्रिय आहेत परंतु या सर्वांमध्ये माधवीताई नरेश जोशी या खंबीर,धाडसी आणि दमदार नेतृत्व म्हणून कार्यरत आहेत.भावी खासदार,माधवीताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तथा मावळ लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निरीक्षक सौ.माधवीताई नरेश जोशी आणि सुप्रसिद्ध युवा उद्योजक महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारणी सदस्य श्री.नरेश जोशी साहेब यांच्या सहकार्यातून नेहमीच विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात.गोरगरिबांना आर्थिक मदत,शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्याना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न,निराधारांसाठी मायेचा हात,महिलांसाठी विविध योजना राबून जनतेच्या मनात आपल्या कार्याचा विश्वासपूर्त धागा तयार करून विकासकामे सुरूच आहेत. मावळ लोकसभा आगामी निवडणुकीच्या पार्श्भूमीवर सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे.अशातच मिळालेल्या सूत्रांच्या माहिती नुसार सत्तेत नसून सुध्दा केवळ जनसेवेसाठी आपल्या स्वखर्चातून सौ.माधवीताई नरेश जोशी आणि श्री.नरेश जोशी यांच्या विशेष प्रयत्नातून जवळजवळ १०० कोटी खर्च करून मावळ मतदार संघाची कायापालट होणार,लोकसभा निवडणूक पूर्वीच संपूर्ण मावळ विकासपूर्ण असेल.