अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती!

157
अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती!

अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती!

अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती!

⭕ पोस्को अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

मूल : 3 डिसेंबर
अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात येताच डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. यावरून आरोपीचे बिंग फुटले. मूल पोलिसांनी आरोपी दुर्योधन रमेश शिडाम याला अटक केली आहे.
पीडित मुलगी अल्पवयीन असून, ती आरोपीची नातेवाईक आहे. ती मुलगी आपल्या मेहूनीला भेटायला काही महिन्यापूर्वी आरोपीच्या गावी गेली होती. तिथे तिची ओळख आरोपीसोबत झाली. दोघेही भ्रमणध्वनीवर बोलू लागले. ही गोष्ट पीडित मुलीच्या घरच्यांना माहीत झाली. त्यावरून मुलगी व आरोपीला समजावून सांगितले होते. काही दिवसानंतर आणखी त्यांच्यात संभाषण सुरू झाले. आरोपीने पीडित मुलीला पळून जाऊन लग्न करू, असेसुद्धा सांगितले होते.
काही दिवसानंतर पीडित मुलीला आरोपीने आपल्या गावी बोलाविले. तसेच तू आपल्या गावाला जाऊ नको, असेही म्हटले होते. आरोपीच्या आई-वडिलांनी तिला ठेवण्यास नकार दिला. त्यावरून आरोपीने बाजारातून मंगळसूत्र घेऊन पीडित मुलीच्या गळ्यात टाकले व पती-पत्नी म्हणून राहू लागले. पती-पत्नी म्हणून राहत असताना आरोपी व पीडित यांच्यात शारीरिक संबंध आले. त्यातून पीडिता गर्भवती राहिली. अशा पीडितेच्या तक्रारीवरून मूल पोलिसांनी कलम 376, 376 (2) (एन) सहकलम 4, 6 पोस्को अधिनियम 2012 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पुढील तपास ठाणेदार सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम करीत आहेत.