मराठा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हस्ते मराठा भवन उद्घाटन

94

मराठा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे रविवार खांदा कॉलनी वसाहतीमध्ये होणार आगमन 

संजय कदम 

पनवेल : मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी पनवेल च्या ऐतिहासिक भूमीत दाखल होणार आहेत.

      सकल मराठा समाज मंडळ खांदा वसाहत येथे रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता मराठा भवन उदघाटन व मराठा कृतज्ञता मेळावा या कार्यक्रमानिमित्त मराठा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील येणार असून या कार्यक्रमासाठी पनवेल मधील आपण सर्व समाज बांधवानी आवर्जून उपस्थित राहावे व समाज कर्तव्य बजवावे अशी आग्रहाची विनंती संतोष जाधव यांनी केली आहे .