प्रधानमंत्री मोदीच्या सभेत काळे झेंडे दाखवुन विरोध करणा-या रिता यादव ला मारण्यात आली गोळी

प्रधानमंत्री मोदीच्या भर सभेत काळे झेंडे दाखवुन विरोध करणा-या रिता यादव ला मारण्यात आली गोळी

प्रधानमंत्री मोदीच्या भर सभेत काळे झेंडे दाखवुन विरोध करणा-या रिता यादव ला मारण्यात आली गोळी.

मिडिया वार्ता न्यूज टिम

सुलतानपुर:- उत्तर प्रदेश राज्यातील सुलतानपुर जिल्हात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना काळे झंडे दाखवणारी कांग्रेसची महिला नेता रीता यादव ला काही गुंड्यानी गोळी मारल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामूळे सर्वीकडे एकच खळबळ उडाली आहे. बंदुकीची गोळी ही रीता यादव याच्या पायाला लागली असल्याची माहिती समोर आली आहे. रिताला गंभीर स्थितीत सीएचसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

प्राप्त माहितीनुसार काही दिवसा आगोदर समाजवादी पक्ष सोडून रीता यादव कांग्रेस पक्षात आली होती. रीता यादव ही पोस्टर बैनर बनवण्यासाठी सुल्तानपुर येथे आली होती. काम संपवून ती आपल्या घरी परत जात असतांना हायवे रोड वर लंभुआ जवळ तीन लोकांनी तिच्या गाडीला ओवर टेक करुन तीची गाडी थांबवली आणि शिवी गाळ करुन रीताला गोळी मारण्यात आली. गोळी तिच्या पायाला लागली, रक्त बाहेर येत आहे अस बघून हमलावर पळून गेले. यानंतर गंभीर स्थितीत रीता यादवला सीएचसी लंभुआचा रुग्णालयात दाखला करण्यात आले. परंतु चांगल्या उपचारासाठी त्याना डॉक्टरानी सुलतानपुर येथील जिला रुग्णालयात रेफर केल. आता हमला करणा-या लोकांनची महिती काढण्यात पोलीस कार्यवाई सुरु केली आहे.

जखमी रीता यादव ने मिडिया ला दिलेल्या माहितीनुसार मी पोस्टर बैनर बनवण्यासाठी सुल्तानपुरला गेली होती. काम संपवून तिथुन परत घरी येताना हाइवे रोड लंभुआ जवळ तीन लोकांनी ओवरटेक करत माझी बोलेरो चार चाकी गाडी थांबवली आणि शिवीगाळ देऊन जीवानिशी ठार करण्याची धमकी दिली. त्या हमलाखोरानी ड्राइवरच्यावर बंदुक रोखली, त्यामूळे मी बंदुक रोखलेल्या व्यक्तीला एक झापड मारली. त्यानंतर ते गोळी मारुन फरार झाले.