newton
सफरचंद न्यूटनच्या डोक्यावर पडलंच नव्हतं....
scientists newton marathi information
सफरचंद न्यूटनच्या डोक्यावर पडलंच नव्हतं….

सिद्धांत
३ जानेवारी २०२१: सफरचंद आणि न्यूटनने लावलेल्या गुरुत्वाकर्षणाची जगप्रसिद्ध गोष्ट तर आपण सगळ्यांनी ऐकलेली असेलच. एका रम्य दिवशी सफरचंदाच्या झाडाखाली बसून विश्वातल्या गूढ वैज्ञानिक गोष्टींचा विचार करत बसलेला असता, न्यूटनच्या डोक्यात झाडावरून एक सफरचंद पडलं..आणि मग काय त्याचं डोक्यातील विचारचक्र वेगाने फिरू लागलं. हे सफरचंद झाडावरून खालीच का पडलं?…हे वरतीच का तरंगल नाही? सफरचंदासारखंच अवकाशात दिसणारा चंद्र, असंख्य तारे पृथ्वीवर का पडत नाहीत? असंख्य प्रश्न. ह्या प्रश्नाची उत्तरे शोधता-शोधता अखेर न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला.

पण न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडलेच नव्हते. हे स्वतः न्यूटनने त्याची आत्मकथा लिहिणाऱ्या लेखकाला सांगितले आहे. Memoirs of Sir Isaac Newton’s Lifewritten by William Stukeley, ह्या १७५२ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये लेखक सांगतो कि, ” एके दिवशी डिनरनंतर आम्ही बागेतील सफरचंदाच्या झाडाच्या सावलीत चहाचा आस्वाद घेत बसलो होतो. दूरवर झाडावरून एक सफरचंद खाली पडलं, आणि त्यावेळी गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा तो (न्यूटन)विचार करू लागला”

म्हणजे सफरचंद पडलं होत, पण ते न्यूटनच्या डोक्यावर मात्र पडलं नव्हतं. हा (गहन) विवाद एक क्षण बाजूला ठेवला आणि न्यूटनने केलेल्या संशोधनाचा विचार केल्यास, न्यूटनशिवाय आज आपण करत असलेली प्रगती अजिबात शक्य झाली झाली नसती, हे आपल्या ध्यानात येते. न्यूटनने वयाची २६ वर्षे पार करण्याच्या आधीच गती आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला होता. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी अतिमहत्त्वाच्या ” ‘कॅलकुलस’ या गणितीय प्रणालीची निर्मित न्यूटनने केली होती.

इतिहासातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून गणला जाणारा न्यूटन वैयक्तित आयुष्यात मात्र व्यवहारी नव्हता असं म्हटलं जात. इतकेच काय त्याकाळचे सहकारी त्याचे विचित्र व्यक्तिमत्त्व असलेला मनुष्य म्हणून वर्णन करायचे . न्यूटनच्या आयुष्यातील अश्या अनेक विचित्र, गमतीदार घटना प्रसिद्ध आहेत.

. न्यूटनने दिली घर जाळून टाकण्याची धमकी.
न्यूटनच्या वडिलांचा अकाली मृत्यू झाला होता. तो तीन वर्षांचा असतानाच न्यूटनच्या आईने दुसरे लग्न केलं आणि न्यूटनला आजीकडे राहणायास पाठवून दिल. त्यामुळे न्यूटन आपल्या सावत्र वडिलांचा इतका तिरस्कार करत होता कि त्याने एकदा त्यांना “मी तुमचे घर जाळून टाकीन” अशी धमकी दिली होती.

newton-house-in-england
न्यूटनचे लहानपणीचे घर.

२. न्यूटनने क्वारंटाईनचा केला होता सदुपयोग.
कोरोना काळात कोरोना झाल्यास क्वारंटाईन होणं, हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. १९६५ मध्ये इंग्लंडमध्ये प्लेगची साथ पसरली होती. त्यावेळी केम्ब्रिज विद्यापीठात असलेल्या न्यूटनला “वर्क फ्रॉम होम” करावे लागले होते. या काळातच न्यूटनने गती आणि गुरुत्वाकर्षण सारख्या बाबींच्या संशोधनाला सुरुवात केली होती.

३. न्यूटनने डोळ्यात घुसवली होती सुई.
प्रकाशकिरण आणि आपल्या डोळ्यांच्या दृष्टीचा अभ्यास करण्यासाठी न्यूटनने आपल्या डोळ्यांच्या खोबणीमध्ये अनेकदा चक्क शिवनकामाच्या सुया घुसवल्या होत्या. या प्रयोगाचे विस्तृत वर्णन त्याने आपल्या जर्नलमध्ये लिहून ठेवले आहे.

bodkin-in-eye-newton
न्यूटनने प्रयोगाची काढलेली आकृती.

४. न्यूटनने सोनं बनविण्याचा केला प्रयत्न.
१६७९ मध्ये न्यूटन आपल्या वूल्सथॉर्पच्या घरी परतला. तिकडे त्याने शिसे या धातूपासून सोनं बनविण्याच्या प्रयोगांचे संशोधन केले. आयुष्याची कित्येक वर्षे त्या प्रयोगांमध्ये घालवली आणि शेवटी असफल ठरला.

५. प्लेगवर औषध म्हणून सुचवली होती बेडकाची उलटी.

जसा आज पृथ्वीवरील लोकांना कोरोना पँडेमिकने विळखा घातलेला आहे,तसा न्यूटनच्या काळात प्लेगने घातलेला होता. लाखो माणसे त्याकाळी प्लेगमध्ये मृत्युमुखी पडली होती. यावर बेडकाने केलेली उलटी आणि तीन दिवस पायाने उंचावर टांगून ठेवलेल्या बेडकाची पावडर प्लेगच्या आजारावर औषध म्हणून न्यूटनने सुचवली होती. 

0_l3_G4hH4jQ6Tjckd
प्लेगच्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा पोशाख

६. न्यूटन: एक राजकारणी
ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा न्यूटनने काम केले होते. पण असे म्हटले जाते कि आपल्या पूर्ण कारकिर्दीत न्यूटन पार्लिमेंटमध्ये फक्त एकदाच बोलला होता, ते सुद्धा पार्लिमेंटमधील एक उघडी खिडकी बंद करण्यासाठी सांगायला.

७. जगाचा विनाश होण्याची न्यूटनने केलेली भविष्यवाणी.
न्यूटन हा वैज्ञानिक असला तरी त्याचा ख्रिश्चन धर्मावर विश्वास होता. १७०४ मध्ये बायबल मधील वैज्ञानिक माहितीचा शोध घेऊन लिहिलेल्या पुस्तकात न्यूटनने लिहिलं होत कि, २०६० मध्ये या जगाचा विनाश होणार आहे.न्यूटनच्या ह्या भविष्यवाणीबाबत आणि त्यामागच्या खऱ्या अर्थाबाबत जगभरातल्या विचारवंतांमध्ये अजूनही अनेक तर्क -वितर्क लढवले जात आहेत.

Isaac-Newton-predicted-the-end-of-the-world-1313439
२०६० मध्ये या जगाचा विनाश होणार – न्यूटनने केलेली भविष्यवाणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here