जि.प.उच्च प्राथ शाळा, भुरकुंडा बु या ठिकाणी साविञीबाई फुले जयंती निमीत्य निबंध स्पर्धा व बक्षीस वितरण

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694
राजुरा:- ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळ,चंद्रपुर
यांच्या संकल्पनेतुन आज दि.०३/०१/२२ ला साविञीबाई फुले यांच्या जयंती निमीत्य जि.प.उच्च प्राथ शाळा, भुरकुंडा बु या शाळेच्या पटांगणात “स्ञी” जिवनावर तसेच “स्ञी शिक्षणाचे महत्व” अशा विविध विषयाला अनुसरूण निबंध स्पर्धा पार पडली, तसेच सदर प्राविण्यपुर्ण निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण सुद्धा उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थांना देण्यात आले.त्याच बरोबर “सन्माण गृहिणींचा” या उपक्रमांतर्गत बचत गटातील महिलांचा प्रमाणपञ देऊन सन्माण करन्यात आला.
तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हनुन लाभलेले मा.अशोकजी अंबागडे यांनी महत्वाची बाब मांडली, आजची स्ञी कोणत्याही क्षेञात मागे राहलेली नाही, ति एक उद्योजकीय नेतृत्व आहे असे मा.श्री अशोकजी अंबागडे (संचालक, ग्रामीण भारत) यांनी संबोधले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत मा.सौ.मंगला आञाम (मुख्याध्यापीका, जि.प.शाळा-भुरकुंडा बु.) यांनी “स्ञी” आज अबला नसुन ति एक सामर्थ्यशाली भविष्याचे वैभव आहे. उद्याचे नावीण्यपुर्ण प्रभावशाली कौशल्य आहेत. प्रत्येक क्षेञात आज अग्रेसर आहे असे संबोधले
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा.प्रफुल मादासवार (अध्यक्ष शा.व्य.स.), मा.राजेन्द्र मादासवार, (पोलीस पाटील) मा.रंजना कोहपरे,मा.बंडु मडावी,मा.दुर्योधन सर मा.प्रविण मडावी,मा.सौरभ मादासवार, मा.सागर कातकर,मा.प्रशिल भेसेकर,मा.किसन बोबडे.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा.बंडु मडावी (शिक्षक) यांनी केले.