तहसिलदार नातेवाईकाचा अंत्ययात्रेत; मंडळ अधिकारी म्हणतो ” माझे क्षेत्र नाही ” ; तलाठ्याचे भारीच उत्तर ” साहेब म्हणतील तर कार्यवाही करतो “

तहसिलदार नातेवाईकाचा अंत्ययात्रेत; मंडळ अधिकारी म्हणतो ” माझे क्षेत्र नाही ” ; तलाठ्याचे भारीच उत्तर ” साहेब म्हणतील तर कार्यवाही करतो

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :-तालुक्यात खनिज संपत्तीची मुक्त चराई सूरू आहे.या गंभीर प्रकाराकडे महसूल विभागाची ” अर्थ ” पुर्ण डोळेझाक सध्या चर्चेचा विषय ठरली.खनिज तस्करांची मुजोरी तालुक्यात दिवसेंदिवस वाढली.कन्हाळगाव अभयारण्यालगत असलेल्या मामा तलावाजवळील शेतात रात्रौ उशिरापर्यंत मुरूमाचे उत्खनन सूरू होते. याची माहीती देण्यासाठी काहीनी गोंडपिपरी तहसिलदारांना भ्रमणध्वनी केला.तहसिलदार म्हणाले ” नातेवाईकाचा मृत्यू झाला. मी अंत्ययात्रेत आहे “.मंडळ अधिकारी म्हणाला ” माझे क्षेत्र नाही “.धाबा तलाठ्याने सबंधीतांना भारीच उत्तर दिले.म्हणाला ” साहेब,म्हणतील तर कार्यवाही करतो ” . या प्रकाराने सामान्य जनता बुचकाळ्या पडली. खनिज चोरीची तक्रार आता करायची कुणाकडे हा मोठा पेच जनतेला पडला आहे.

वन्यजीवांना काही त्रास नाही जी…

कन्हारगाव अभयारण्य लगत असलेल्या मामा तलावा शेजारी खाजगी जमिनीतून मुरूमाचे उत्खनन सूरू होते.हा प्रकार रात्रौ नऊ वाजे पर्यंत सूरू होता.या तलावात चिवंडा वनक्षेत्रातील वन्यजीव पाणी पिण्यासाठी येतात.रात्रौ उशिरापर्यंत वाहनाचा आवाज होत असल्याने वन्यजीव दचकतात.त्यांचा भ्रमंतीवर विपरीत परिणाम होत आहे.मात्र वनविभाग म्हणतो ” त्याचा काही परिणाम होत नाही जी..” वनविभागाची निर्मिती वन्यजीवांचा सूरक्षेसाठी झाली खनिज चोरांसाठी,हा प्रश्न सामान्यांना पडला आहे.