गडचिरोली नगरपरिषद क्षेत्राची हद्दवाढ होणार
माडेतुकुम,नवेगाव, मुरखळा ,कोटगल,इंदाळा,खरपुंडी या गावांचा होणार समाविष्ट
नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते ठराव मंजूर
*नंदलाल एस. कन्नाके*
*जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी*
*गडचिरोली*
मिडिया वार्ता न्युज गडचिरोली
मो.नं. 7743989806
गडचिरोली :- स्थानिक नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा मा.नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये गडचिरोली नगरपरिषद क्षेत्राची हद्दवाढ विषयचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यामध्ये माडेतुकुम,नवेगाव,कोटगल,इंदाळा,खरपुंडी या ग्रामपंचायती समाविष्ट होणार आहेत.*
*तसेच महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१ व महाराष्ट्र गुंठेवारी विकास सुधारणा अधिनियम २०२१ चे अंमलबजावणीबाबत व अंमलबजावणीसाठी एजन्सी नियुक्त करणे,मौजा सोनापूर सर्वे क्र. ११७/१,१२३/२ साईट अँड सर्व्हिसेस अंतर्गत विकसित केलेल्या शिल्लक भूखंडापैकी शिल्लक भूखंडाबाबत लिलाव प्रक्रिया करून हस्तांतरित करणे,चामोर्शी नाका,शासकीय विज्ञान महविद्यालय जवळ गोकुलनगर,चोमोर्शी रोड चौकास क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा चौक नाव देणे,नप क्षेत्रातील नगर परिषद अंतर्गत शाळा,फिल्टर प्लांट,पंप हाउस,स्ट्रीट लाईट,नगरपरिषद कार्यालय,नगरभवन येथे विद्युत पुरवठा करिता ३ मेगावाट विजेची क्षमता असलेले ऑनलाइन सोलार पॉवर प्रोजेक्ट तयार करणे,सन २०२२-२३ या वर्षामध्ये प्राप्त होणाऱ्या जिल्हा वार्षिक योजना व राज्यस्तर योजना अंतर्गत निधीमधून कामे प्रस्थावित करणे,शहरात मुख्य रस्त्याच्या बाजूला विविध ठिकाणी प्रवासी निवारा उभारणे इत्यादी विषयांवर चर्चा,विचार विनिमय करून ठराव मजूर करण्यात आले.*
*सभेला उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे,सभापती वर्षा नैताम,नगरसेवक प्रमोदजी पिपरे,रमेशजी भूरशे,मुख्याधिकारी विशाल वाघ,केशव निंबोड,नगरसेविका वैष्णवीताई नैताम,लताताई लाटकर,निताताई उंदिरवाडे,अल्काताई पोहनकर,रितु कोलते,पुजा बोबाटे,वर्षा बट्टे,रंजना गेडाम,मंजुषा आखाडे,नगरसेवक सतीश विधाते,रमेश चौधरी,आनंद शृंगारपवार,नितीन उंदिरवाडे,गुलाब मडावी,भुपेश कुळमेथे,संजय मेश्राम तसेच नगरपरिषद येथील कर्मचारी उपस्थित होते.*