सामूहिक वनहक्क प्राप्त कोरंबी ग्रामसभेच्या वतीने रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीला कार्यारंभ
कार्यारंभ करणारे कोरंभी हे महाराष्ट्र राज्य व देशातील पहिलेच गाव आहे – दिलीप गोडे
*अरुण रामुजीभोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*
नागभीड : -महाराष्ट्र शासनाद्वारे नुकताच दि. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांना रोजगार हमी योजनेची अंमबजावणी यंत्रणा मान्यता मिळाली आहे. यानुसार रोजगार हमी योजने अंतर्गत अंमलबजावनीचा कार्यारंभ करणारे कोरंभी हे महाराष्ट्र राज्य व देशातील पहिलेच गाव आहे – दिलीप गोडे
महाराष्ट्र शासनाचे नियोजन विभागाद्वारे नुकताच दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ रोजी सामुहिक वन हक्क मान्यता प्राप्त ग्रामसभांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मान्यतेचा शासन निर्णय प्रथमच निर्गमित करण्यात आला आहे. नागभीड तालुक्यातील ग्रामसभा कोरंबी च्या वतीने सदर शासन निर्णयान्वये आज दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी रोजगार हमी योजनेचा कार्यारंभ करून हक्क प्राप्त केला असून अशाप्रकारे कार्यवाही चा करणारे कोरंबी हे महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील पहिलेच गाव असल्याचा बहुमान कोरंबी ग्रामसभेने प्राप्त केला आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य दिलीपजी गोडे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना केले आहे. ते महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत अंमलबजावणी यंत्रणा म्हणून कार्यारंभ तथा शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ विकास मंडळ नागपूर चे माजी सदस्य डॉ. किशोर मोघे, सेवानिवृत्त उपवन संरक्षक वासुदेवजी कुळमेथे, रिवार्ड संस्था नागभिड चे अध्यक्ष गुणवंत वैद्य, संदेश संस्था गडचिरोली चे अध्यक्ष डॉ. गुरुदास सेमस्कर, खोज संस्था परतवाडा (अमरावती) चे महादेव गिल्लुरकर श्रीकांत लोडम, ललित भांडारकर, सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केशवजी जांभळे सचिव बाबुरावजी जुमनाके यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना केशव जांभळे यांनी मागील वर्षभरात सामुहिक वनहक्क प्रभावी अंमलबजावणी विषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित पाहुण्यांचे समायोचित मार्गदर्शन ग्रामस्थांना झाले. कार्यक्रमाचे संचालन श्री कुंभारे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती कोरभी चे सर्व पदाधिकारी व नागरिकांनी अथक परिश्रम घेतले.