मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या “पत्र भूषण पुरस्कार-२०२३ पुरस्काराने रमेश लांजेवार होणार सन्मानित
मीडियावार्ता
३ जानेवारी, मुंबई: दरवर्षी मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य, मुंबई तर्फे दिल्या जाणारा “पत्र भूषण पुरस्कार -2023″श्री रमेश कृष्णराव लांजेवार, नागपूर यांना पत्रकारीतेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या बद्दल जाहीर करण्यात आला आहे. 1996 पासून मराठी व हिंदीमध्ये अनेक वर्तमानपत्रांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय,जिल्हास्तरावरील घडामोडीं साहित्याच्या माध्यमातून व लेखणीच्या माध्यमातून लेखन करून आदर्श समाज कसा घडवीता येईल व सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सरकारपर्यंत कशा पोहचवीता येईल या उद्देशाने प्रखर भुमिका धारधार लेखणीच्या माध्यमातून रमेश लांजेवार नेहमी मांडत असतात.
त्याचप्रमाणे देशाच्या जडणघडणीमध्ये येणाऱ्या घटना कळत नकळत लेखणीच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत,प्रशासनापर्यंत व सरकार पर्यंत पोहोचविण्याचे काम करीत असतना व लेखणीतून समाजकार्य करण्याचे काम रमेश लांजेवार करत आले आहेत. त्यांच्या निर्भिड लेखणीमुळे स्तंभ लेखक म्हणून त्यांच्या लेखणीला अनेक वृत्तपत्रांमध्ये मानाचे स्थान मिळत आले आहे.
या पुरस्काराबाबत प्रतिक्रिया देताना रमेश लांजेवार म्हणाले की, माझ्या कार्याची पावती म्हणून मला 6 जानेवारी दर्पण दिन व मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने या दिवशी मला पुरस्कार मिळत आहे हे माझे अहोभाग्य आहे. दिनांक 6 जानेवारी 2023 ला मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या वतीने मराठी ग्रंथसंग्रहालय सभागृह,दादर, मुंबई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मला “पत्र भूषण पुरस्कार -2023 ने सन्मानित करण्यात येणार आहे.याकरीता मी संपूर्ण वृत्तपत्र समूहाचा व मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा अत्यंत आभारी आहे.कारण माझ्या लेखणीला वृत्तपत्र समुहानेच मोठे स्थान प्रदान केले आहे.यामुळेच मराठी वृत्तपत्र लेखक संघ,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या वतीने “पत्र भूषण पुरस्कार -2023 ने सन्मानित करण्यात येणार आहे.याचे संपूर्ण श्रेय वृत्तपत्र समूह, सन्माननीय संपादक यांना जाते.कारण मला अनेक वृत्तपत्रांनी सन्मानाचे स्थान दिले आहे.त्याबद्दल मी संपूर्ण वृत्तपत्र समूहाचा अंत्यंत आभारी आहे.