एन जे पटेल महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मनोज एल खोब्रागडे

सह संपादक मीडिया वार्ता न्युज 

मो: 9860020016

मोहाडी : – सविस्तर वृत्त असे आहे की एन जे पटेल महाविद्यालय मोहाडी येथे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांचा जयंती समारोह राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य डॉ जे. एम. पांडे यानी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन विद्यार्थ्याना ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांचे विचार अमलात आणण्याचे आवाहन केले. तत्पुर्वी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ महेशकुमार भैसारे यानी प्रास्ताविकातुन सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षावर प्रकाश टाकला व त्यांच्या जीवन कार्यवार आधारित लघु चित्रपट दाखवून त्यावर विचार मंथन करण्याची अपेक्षा केली.

डॉ विजया राऊत यानी फुले दांपत्य यांच्या विचाराना वास्तवाची जोड़ देण्याचे आवाहन केले. प्रा संतोष जाधव यानी त्यांचे विचार एक दिवस नाहीं तर वर्षभर लक्षात असू द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी विद्यार्थ्यमधुन रिया आथिलकर, रजनी झेलकर, मोहन नंदनवार, रजनी गायधने, रुचिता बारई यानी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन पायल झेलकर तर आभार प्रदर्शन काजल निमकर हिने मानले. या प्रसंगी डॉ वरकडे, डॉ डाकरे, डॉ वानखेडे व बहुसंख्य विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या कार्य कर्तुत्वाला अभिवादन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here