देशी दारू, डीझेलसह कोळसा तस्करी जोमात, तस्करांना पोलीसांचे अभय?
🖋️ साहिल सैय्यद
📱93079 48197
गडचांदुर, 4 जानेवारी: शहरात देशी दारू, डिझेल, कोळसा सारख्या मोठ्या व्यवसायात अवैध धंद्यांना ऊत आला असून पोलीस प्रशासनाचे याकडे होत असलेले दुर्लक्ष गडचांदुर शहवासीयांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्याना पोलिसांचा छुपा आशीर्वाद तर नाही ना ? अशी शंका शहरातील सुजाण नागरीक व्यक्त करीत आहेत.
पोलिसांच्या मूक संमती याप्रकारे जोमात अवैध धंदे चालूच शकत नाहीत.
पोलिस निरीक्षकांनी या अवैध धंद्याकडे डोळेझाकपणा केल्यानेच शहरात अवैध धंद्याला बळ मिळत आहे यासोबतच गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर होत असलेली वाढ नागरिकांच्या निदर्शनास येत असून उप – विभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांनी या गंभीर विषयाकडे जातीने लक्ष द्यावे अशी मागणी शहरातील नागरिकांतर्फे केली जात आहे.