हुतात्मा गौरव पुरस्कार अभिवादन सभा नेरळ येथे संपन्न
✒️संदेश साळुंके
नेरळ रायगड प्रतिनिधी
📞9011199333
नेरळ;कर्जत तालुक्यातील क्रांतिकारक यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या रक्ताचा अभिषेक केला आहे. हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे स्मरण राहावे म्हणून हुतात्मा स्मारक समिती कार्य करीत असून युवा पिढीने क्रांतिकारकांचे विचार आत्मसात करावे असे आवाहन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.तर हुतात्मा गौरव पुरस्काराची उंची एव्हरेस्ट वीर गिर्यारोहक संतोष दगडे यांच्यामुळे आणखी वाढली आहे असे प्रतिपादन माजी आमदार सुरेश लाड यांनी व्यक्त केले. दरम्यान,गिर्यारोहक मंडळी देशासाठी लढणाऱ्या हुतात्म्यांना तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानतो असे प्रतिपादन संतोष दगडे यांनी केले.
कर्जत तालुक्यातील माथेरान येथील क्रांतिकारक भाई कोतवाल आणि मानिवली येथील क्रांतिकारक हिराजी पाटील यांना दोन जानेवारी 1943 रोजी सिध्दगड येथे हौतात्म्य प्राप्त झाले.या दोन्ही हुतात्म्यांचा बलिदान दिन नेरळ येथील हुतात्मा चौक येथे हुतात्मा स्मारक समिती तर्फे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.त्या कार्यक्रमाला कर्जत विधानसभा मतदारसंघ आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड,कृषी भूषण शेखर भडसावळे, स्वातंत्र्यसैनिक यांचे नातेवाईक शरद भगत,नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी, उप सरपंच मंगेश म्हसकर,नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्यासह कर्जत माजी नगराध्यक्ष राजेश लाड, नेरळ ग्रामपंचायत सदस्य गीतांजली देशमुख,शिवाली पोतदार,जयश्री मानकामे,श्रद्धा कराळे,तसेच नम्रता कांदळगावकर आदी उपस्थित होते.सुरुवातीला हुतात्म्यांचे पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन आमदार थोरवे आणि माजी आमदार लाड यांनी केले.तर मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन आणि मशाल पूजन करण्यात आले.यावेळी स्मारक समितीचे चंद्रकांत काळे आणि केदार खडे यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी तर सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले.त्यावेळी मान्यवरांचे स्वागत स्मारक समितीचे विजय मांडे,दर्वेश पालकर,मल्हार पवार,कांता हाबले,नितीन पारधी, संजय अभंगे,ॲड ऋषिकेश कांबळे, दिनेश सुतार,सुमित क्षीरसागर,ज्ञानेश्वर बागडे,रोशन दगडे,संदेश साळुंखे,गणेश मते,बंटी शिर्के यांनी केले.
या कार्यक्रमात 17 मे 2023 रोजी जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर सर करणारे गिर्यारोहक संतोष दगडे यांना हुतात्मा गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. मानपत्र,सन्मान चिन्ह शाल, श्रीफळ आणि झाडाचे रोप देवून आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.तर भारतीय थळ सेनेतील निवृत्त जवान कुमार जाधव – नेरळ आणि निवृत्ती नीलधे – टेंभरे यांचा विशेष सन्मान माजी आमदार सुरेश लाड यांचे हस्ते करण्यात आला.तर 2 जानेवारी 2024 रोजी नेरळ हुतात्मा चौक ते मुरबाड तालुक्यातील सिध्दगड असा प्रवास सायकल वरून करणारा 10वर्षीय हिरेन राम हिसालगे यांचा विशेष सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला.या कार्यक्रमाला नेरळ गावातील सर्व क्षेत्रातील मान्यवर तसेच माणगाव वाडी आश्रमशाळा,कोतवाल वाडी ट्रस्ट,नेरळ विद्या मंदिर,नेरळ विद्या विकास, एल ए ई एस शाळा यांचे विद्यार्थी गिर्यारोहक संतोष दगडे यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी उपस्थित होते.
आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी बोलताना कर्जत तालुक्याला क्रांतिकारकांचा इतिहास आहे,या तालुक्यातील दोन क्रांतिकारक यांनी आपल्या रक्ताचा अभिषेक देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी घातला आहे.त्यामुळे त्यांचे नाव आमच्या सारख्या सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांसाठी स्फूर्ती देणारे असते.त्यात हुतात्मा स्मारक समिती मधील पत्रकार मंडळी यांनी गेली 20वर्षे अविरतपणे हुतात्म्यांच्या कार्याच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी केलेले कार्य समाजाला विसरता येणार नाही.त्यामुळे नेरळ येथील हुतात्मा स्मारक आणखी सुशोभित होण्यासाठी आपल्या आमदारकी चे काळात भरीव निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.माजी आमदार सुरेश लाड यांनी हुतात्मा स्मारक समिती कडून गेली 15-20वर्षे हुतात्मा गौरव पुरस्कार देण्याचे कार्य सुरू आहे.मात्र दरवर्षी एखादा हिरा शोधावा तसे हिरे शोधून त्यांना सन्मानित करण्याची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली आहे. यामुळे समाजातील रत्नांची ओळख कर्जत तालुक्यात होत असल्याच्या भावना आपल्या भाषणात व्यक्त केल्या.या कार्यक्रमाला कर्जत,नेरळ आणि माथेरान येथून देशप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते,शेवटी विद्या विकास शाळेच्या शिक्षकांनी वंदे मातरम् सादर केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्मारक समितीला महेश भगत,राजू वाघरे,सुभाष नाईक,ॲड जगदीश कराळे, झुगरे,बाबू डबरे,मामा शिंदे,आदींनी मदत केली.
एव्हरेस्टच्या प्रवासात देव आठवला..
एव्हरेस्ट वीर गिर्यारोहक संतोष दगडे यांनी हुतात्मा गौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या एव्हरेस्ट प्रवासाचे वर्णन तब्बल 35 मिनिटे ओघावत्या भाषेत करीत क्रांतिकारकांचे कार्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य निश्चित मोठे असून छत्रपतींचा गनिमी कावा आपल्याला एव्हरेस्ट शिखर पार करण्यात महत्वाचा ठरला असे आवर्जून सांगितले.तर या हुतात्मा चौक आणि त्याची देखरेख यामुळे माथेरान वरून येणाऱ्या सर्वांसाठी एक हवेहवेसे ठिकाण निर्माण केले आहे.हे स्थळ लँडमार्क बनले असून आपण ही मोहीम विद्यार्थ्यांमध्ये सुरू केली होती आणि या मोहिमेची सर्व माहिती देखील आज हुतात्मा गौरव पुरस्कार स्वीकारताना विद्यार्थ्यांमध्ये मिसळून देत आहे हा फार मोठा आनंदाचा क्षण असल्याचे कबूल केले.मात्र अशा जागतिक दर्जाच्या मोहिमेत यशस्वी होण्यासाठी देवाची श्रद्धा महत्वाची आहे असे सांगून देवाच्या भरवशावर शिखर सर करून पुन्हा सुखरूप आपल्यात आहे असे मान्य केले.
हुतात्म्यांचे बलिदानाचे स्मरण युवा पिढीने आत्मसात करावे.. महेंद्र थोरवे
हुतात्मा गौरवाची परंपरा कायम आहे..सुरेश लाड
हुतात्मे आमच्यासाठी आदर्श.. संतोष दगडे
कर्जत,