गटारात अडकलेल्या प्राण्याला मिळाले जीवदान
✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞
कोलाड- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील वरसगांव नाक्या वरील बाजारपेठेतील गटाराचे काम अर्धवट व निस्कृष्ठ दर्जाचे असुन काही ठिकाणी झाकण नाही तर काही ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत आहेत याचा नाहक त्रास येथील नागरिक, वाहन चालक व प्राणी यांना भोगावा लागत आहे यामुळेच सकाळी या गटारांमध्ये कुत्र्याचा पिल्लू जाऊन पडला तेथील समोरच असलेल्या अक्का सपकाळ वडापाव वाले यांच्या लक्षात येतात त्यांनी त्याला काढण्याचे प्रयत्न केले पण ते त्यांना जमले नाही त्यांनी लगेच आजूबाजूच्या प्राणी मित्रांना सांगितले त्यांना कळताच तातडीने त्यांनी घटनास्थळी जाऊन त्या पिल्लाला गटाराचे झाकण काढून मोठ्या चतुराई त्या पिलाला बाहेर काढले व त्याला आंघोळ घालून स्वच्छ करण्यात आले यावेळी प्राणी मित्र निलेश लोखंडे अकलेश यादव समीर इंगवले हितेश जैन व इतर सर्व प्राणी मित्रांनी त्या पिल्लाचे प्राण वाचवले अर्धवट राहिलेले गटाराचे काम व त्यावरील झाकण कोणाचा नाहक बळी गेल्या नंतर पूर्ण केले जाईल काय? अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांकडून केली जात आहे.