महिलांनी आत्मनिर्भरतेची ज्योत तेवत ठेवली पाहिजे: किरण बोढे

महिलांनी आत्मनिर्भरतेची ज्योत तेवत ठेवली पाहिजे: किरण बोढे

महिलांनी आत्मनिर्भरतेची ज्योत तेवत ठेवली पाहिजे: किरण बोढे

महिलांनी आत्मनिर्भरतेची ज्योत तेवत ठेवली पाहिजे: किरण बोढे

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती
.. साहिल सैय्यद 🖋️/प्रतिनिधि
📲9307948197
घुग्घुस : येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात शुक्रवार, ३ जानेवारीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

मनोगत व्यक्त करतांना प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन महिलांना प्रेरणा देणारे आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन प्रत्येक महिलांनी आपल्या जीवनात शिक्षण आणि आत्मनिर्भरतेची ज्योत तेवत ठेवली पाहिजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य महिलांच्या सक्षमीकरणासाठी होते सावित्रीबाई स्त्री शिक्षणात ज्ञानज्योती आणि क्रांतिज्योती म्हणून ओळखल्या जातात भारतातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई यांचा जन्म सातारा जिल्ह्याच्या नायगावात ३ जानेवारी १८३१ रोजी झाला सावित्रीबाईचा जन्मदिन बालिकादिन म्हणून साजरा केला जातो.

यावेळी प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, सुचिता लुटे, पुजा दुर्गम, उज्ज्वला उईके, वैशाली देवतळे, नितु जैस्वाल, सविता गोहणे, पुष्पा रामटेके, विना गुच्छाईत, मीना नगराळे, सुलोचना रोहणकर, किरण पाझारे, तनिषा मेश्राम, सुनीता पाटील, सिंधू कवडकर, सुनीता घिवे, सुनंदा लिहीतकर, भाजयुमोचे अमोल थेरे, साजन गोहणे, वसंता भोंगळे, चिन्नाजी नलभोगा, प्रदीप जोगी, प्रमोद भोस्कर, कोमल ठाकरे व मोठया संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.