गोरेगाव पश्चिम प्रेम नगर मधील रस्त्यावर वीट रॅबिट चा ढीग, होतेय वाहतूक कोंडी, महापालिकेचा दुर्लक्ष.

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुबंई शहर प्रतिनिधी.
📞 7304654862 📞

मुंबई :- गोरेगाव पश्चिम प्रेम नगर येथील मुख्य रस्त्यावर कोणी आज्ञताने वीट सिमेंट रॅबिट चा ढीग सार्वजनिक सौचाल्याजवळ भर रस्त्यात टाकल्याने, त्याचा महिनाभर परिणाम तिथल्या वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात होत आहे.

हा रस्ता गोरेगाव एस व्ही रोड येथून प्रेम नगर वरून गोरेगाव लिंक रोड ला कनेक्ट होतो. या मुख्य रस्त्यावरून हजारो लोकं कामानिमित्त सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री ये -जा करत असतात. त्यांचा अर्धा वेळ तिथल्या वाहतूक कोंडीमूळ वाया जातो. हा रस्ता स्लम एरिया असल्याने कायम गजबजलेला असतो, बाजूलाच भाजी मार्केट संध्याकाळी चालू होतो. बाजार चालू झाल्यावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन लोकांना चालायला जागा उरत नाही.

विशेष म्हणजे मागील वर्षी हा पूर्ण रस्ता सिमेंट काँकरीट दर्जाचा रुंद करण्यात आला आहे. पण तिथल्या अवैध पार्किंग मुळे, रस्ता वाहतुकीला एकच लेन मिळते समोरून समजा एखादी मोठी गाडी आली कि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. व तिथून शेअर ऑटो अतिवेगाने धावत असतात, मोठी बाब म्हणजे तिथल्या अवैध पार्किंग सतत वाढणारे फेरीवाले, यांच्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. या समस्या पाहता तिथल्या पालिकेचे अपयश पाहायला मिळते.

सदर आता पालिकेने हा विटांचा ढीग कोणी टाकला, ते शोधून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे, व त्या विटा चा ढीग उचलून विल्हेवाट लावण्याची मागणी तिथले स्थानिक नागरिक करत आहेत. आणि तिथल्या अवैध पार्किंग व वाढत्या फेरीवाल्यांवर पालिका कायम स्वरूपी काय कार्यवाही करेल, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.