आमदार कॅप्टन तामिल सेलवन शिव हिंदू स्मशान भूमी लाखोचा भष्ट्राचार.
माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहिती नुसार हा भष्ट्राचार उघड. भिखारी फाऊंडेशन करणार 20 फेब्रुवारी 2021 पासून सायन हिंदू समशान भूमी येथे दक्ष नागरिकाच्या वतीने आमरण उपोषण.
मुंबई:- सायन कोळीवाडा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार कॅप्टन तामिल सेलवन यांच्या सुमारे 46 लाख रुपयांच्या आमदार निधी लंपास करण्यात आल्याची धक्कादायक माहिती RTI माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहिती वरुन हे उघड झाले.
शिव हिंदू स्मशान भूमी येथे प्रवेश द्वार उभारण्याकरिता 20 लाख तर स्नानगृह, मुतारी, शौचालय, लादीकरन इत्यादी विकास कामांकरिता ह्या आमदार निधीचा वापर करण्यात आले पाहिजे होते परंतु सदर ठिकाणे फक्त प्रसिद्धी फळक म्हाडा अधिकारी यांच्या उपस्तिथीत लावण्यात आले होते ज्याची संपूर्ण माहिती माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली असता भिखारी फॉउंदेशन मार्फत सदर कामांकरिता ठेकेदारा मार्फत ठकबाकीची पूर्तता करण्याकरीत सादर केलेले सर्व बिल थांबविण्यासाठी तसेच सदरची पुन्हा चौकशी करून सर्व कामे करून घ्यावे व संबंधी निरक्षण अधिकारी वर शिष्ठभंगाची कारवाई करण्यात यावी असे पत्र संबंधित विभागत सादर करण्यात आले असून पुढील 19 फेब्रुवारी 2021 रवीवार पर्यंत रात्री 11.59 मिनिटांपर्यंत नमूद कामे पूर्ण न झाल्यास दिनांक 20 फेब्रुवारी 2021 पासून सायन हिंदू समशान भूमी येथे दक्ष नागरिकाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे याची नोंद शासनानी घ्यावी अशी माहिती प्रकाश वि. सिंग. अध्यक्ष – भिखारी फॉउंडेशन प्रेस नोट कडुन पत्रकारांना दिली. अधिक माहितीसाठी ९६९९०२१८५८ वर संपर्क साधावे।