गॅस सिलेंडर ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या सिलेंडरच्या किंमती.

54

गॅस सिलेंडर ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वाढल्या सिलेंडरच्या किंमती.

gas-cylinder-shock-to-customers-cylinder-prices-increased-by-rs-25-after-budget-2021
gas-cylinder-shock-to-customers-cylinder-prices-increased-by-rs-25-after-budget-2021

मुंबई:- एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तेल कंपन्यांनी बजेटनंतर 2021 एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठी ऑइल मार्केटिंग कंपनी असणाऱ्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने 4 फेब्रुवारी रोजी एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ केली आहे. इंडेनने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार गॅस सबसिडी नसणाऱ्या एलपीजीची किंमत मुंबई आणि दिल्लीमध्ये 25 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. दरम्यान कमर्शिअल गॅसच्या किंमतीत 6 रुपयांची घट करण्यात आली आहे.

काय आहेत नवे दर?

14.2 किलोच्या एलपीजी गॅसची किंमत 694 रुपये होती, या वाढीनंतर आता सबसिडी नसणाऱ्या या एलपीजी गॅसची किंमत 719 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅसच्या किंमती बदलतात. पण या महिन्यात 1 फेब्रुवारी रोजी बजेट असल्याने त्या दिवशी किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नव्हता. जानेवारी महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता. मात्र फेब्रुवारीमध्ये एवढ्या मोठ्या फरकाने किंमती वाढल्याने ग्राहकांसाठी हा झटका मानला जात आहे. जानेवारीमध्ये कमर्शिअल गॅसच्या किंमती वाढल्या होत्या.

तुमच्या शहरात 14.2 किलोग्रॅम सिलेंडरचे काय आहेत दर?

नवी दिल्ली- 719 रुपये

मुंबई- 719 रुपये

चेन्नई- 735 रुपये

कोलकाता- 745.50 रुपये

काय आहेत कमर्शिअल गॅसच्या किंमती?

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार 19 किलोच्या कमर्शअल गॅसच्या किंमती आज 4 फेब्रुवारी 2021 रोजी पुढील प्रमाणे आहेत

नवी दिल्ली- 1533 रुपये

मुंबई- 1482.50 रुपये

चेन्नई- 1649 रुपये

कोलकाता- 1598.50 रुपये