in-gondia-chimurdi-was-killed-by-his-father-for-only-rs
in-gondia-chimurdi-was-killed-by-his-father-for-only-rs

गोंदियात केवळ 5 रुपयांसाठी बापाने घेतला चिमुरडीचा जीव.

in-gondia-chimurdi-was-killed-by-his-father-for-only-rs
in-gondia-chimurdi-was-killed-by-his-father-for-only-rs

गोंदिया:- गोंदीया जिल्हातील तिरोडा तालुक्यातील लोणारा गावात जन्मदात्या बापाने आपल्या दिड वर्षाचा मुलीची हत्या केल्याची मन हेलवणारी घटना समोर आली आहे. त्यामुळे लोणारा गावात सर्वीकडे दुख व्यक्त करण्यात येत आहे.

प्राप्त माहिती नुसार मुलीला खाऊ खाण्यासाठी 5 रुपये न दिल्याने ती चिमुकली जोरात रडत होती. त्यामुळे रागात येऊन मुलीला मर असे म्हणून जोराने दारावर आपटून जन्मदात्यानेच तिचा खून केला व जन्मदाता या शब्दालाच कलंकीत केल्याची काळीज पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील लोणारा घडली आहे.

विवेक विश्वनाथ उइके वय 28 रा. लोणारा असे आरोपी पित्याचे नाव असून वैष्णवी विवेक उइके वय 1 वर्ष 8 महीने असे मृत मुलीचे नाव आहे. फिर्यादी वर्षा विवेक उइके रा. लोणारा यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here