‘त्याने’ विनयभंग केल्याच्या बदल्यात ‘याने’ पण केला विनयभंग.

58

 ‘त्याने’ विनयभंग केल्याच्या बदल्यात ‘याने’ पण केला विनयभंग.

 'Instead of' he 'molested' but 'he molested.

अकोला:- जिल्हातील बाळापूर गावात घराशेजारी राहणाऱ्याने एका जणाच्या पत्नीचा विनयभंग केला. याची माहिती पत्नीने दिल्यावर संतप्त झालेल्या पतीने बदला घेण्याच्या उद्देशाने त्याच्या घरी जावून त्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना पारस येथे बुधवारी घडली. दोन्ही महिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी दोघांविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पारस येथे घराजवळ राहणाऱ्या शेजाऱ्याने, 2 फेब्रुवारी रोजी महिलेचा पती घरी नसल्याचे पाहून, तिच्या घरी गेला. घराच्या दरवाजावर थाप दिली. महिलेने दरवाजा उघडल्याने आरोपीने तिचा विनयभंग केला. ही बाब महिलेने पतीला सांगितली, पतीने विनयभंगाचा बदला विनयभंग करून घेतला. 3 फेब्रुवारीला सकाळी त्या व्यक्तीच्या घरी जावून त्याच्या पत्नीचा विनयभंग केला. दोघांच्याही पत्नींनी परस्परांविरूद्ध दिलेल्या तक्रारीनुसार बाळापूर पोलिसांनी दोघांविरूद्ध भादंवि कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला. या दोन घटनांमुळे गावात विनयभंगाचा विषय चर्चेचा बनला आहे.