जालना महिला सरपंचपदासाठी शुक्रवारी आरक्षण सोडत.

50

जालना महिला सरपंचपदासाठी शुक्रवारी आरक्षण सोडत.

 Leaving reservation for Jalna women sarpanch on Friday

Leaving reservation for Jalna women sarpanch on Friday

प्रदिप शिंदे प्रातिनिधि
जालना:- जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या महिला सरपंचपदासाठी दि.5 फेब्रुवारी शुक्रवारी दुपारी दोन वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज बुधवारी सकाळी स्पष्ट केले आहे.
जालना जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली असून काही ग्रामपंचायत च्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत देखील काढण्यात आली आहे. महिला सरपंचपदासाठी दि.1 फेब्रुवारी रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केली होते. मात्र काही कारणास्तव सदर सोडत पुढे ढकलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. आज बुधवारी जालना जिल्हाचे जिल्हाधिकारी बिनवडे यांनी जिल्ह्यातील महिला सरपंचपदासाठी दि.5 फेब्रुवारी शुक्रवारी दुपारी दोन वाजता त्या त्या तालुक्यातील तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात यावेत असे आदेश काढले असून तशा सूचना जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे