अर्थसहाय्यची कलावंताना मुदत वाढवा मिळावी* *कलावंत विकास संघर्ष समितीचे निवेदन

19

अर्थसहाय्यची कलावंताना मुदत वाढवा मिळावी* *कलावंत विकास संघर्ष समितीचे निवेदन

अर्थसहाय्यची कलावंताना मुदत वाढवा मिळावी* *कलावंत विकास संघर्ष समितीचे निवेदन

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/पवनी:-राज्यात कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रम बंदीमुळे कलावंतांची आर्थिक नुकसान झाली. अशांना शासनाकडून अर्थसहाय्य देण्यासाठी 3 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याची दिलेली मुदत अल्प स्वरूपाची असल्याने ती वाढवून देण्याची मागणी कलावंत विकास संघर्ष समितीने तहसीलदार नीलिमा रंगारी पवनी मार्फत जिल्हाधिकारी भंडारा यांना केली आहे.
प्राप्त माहितीनुसार देशात कोरोना महामारीचा मार्च 2019 पासून शिरकाव होऊन विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनमानावर विपरीत परिणाम झाला. यात सांस्कृतिक क्षेत्रही सुटले नाही. कलेच्या भरवशावर जीवनाचा गाडा हाकणारा कलावंत सतत दोन वर्षीय कार्यक्रम बंदीमुळे आर्थिकतेने पुरता होरपळून निघाला. दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद बहरविणारा कलावंत जगण्याच्या वेदनेने घायाळ झाला असतांना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत दिलासा देऊन गेली. मात्र परिपत्रकाची अंमलबजावणी होत असताना कलावंतांना 3 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची दिलेली मुदत अन्यायकारक असल्याने याचा लाभ संपुर्ण कलावंतांना मिळेल यावर प्रश्नचिन्ह आहे.
प्रायोगिक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांपर्यंत सदर अर्थसहाय्यची माहिती नसल्याने बहुतांशी कलावंत वंचित राहणार आहेत. म्हणून सदर योजनेचा लाभ सर्व कलावंतांना मिळावा यासाठी अर्ज करण्याची मुदत फेब्रुवारी अखेरपर्यंत वाढवून देण्याच्या मागणीचे निवेदन कलावंत विकास संघर्ष समितीद्वारे जिल्हाधिकारी भंडारा यांना पाठविण्यात आले. निवेदन देतांना समितीचे संसथापक अध्यक्ष तथा जिल्हा कलावंत निवड समिती सदस्य मनोहर मेश्राम, नरेंद्र रामटेके, भक्तराज गजभिये, शाहीर वामन रामटेके, सुनील उपरिकर, नाना मेश्राम, शाहीर शामबाबू इत्यादी उपस्थित होते.