ओबीसी क्रांती मोर्चा च्या वतीने लाखनी येथे हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी:-समाजातील सर्व थरांच्या स्त्रियांत विशेषप्रसंगी स्त्रियांसाठी हळदीकुंकू समारंभ करण्याची पद्धत आजतागायत सुरू आहे.हे समारंभ म्हणजे गृहिणीपूजन,आदरसत्कार व स्नेहमीलन हा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक गोष्टीचे प्रतीक आहे.
पूजा,विधी आणि मंगल संस्कारात कुंकवाबरोबर हळद असते.हळद आणि कुंकू ही सौभाग्यद्रव्ये समजली जातात.हिंदू समाजातील सौभाग्यवती स्त्रिया आपल्या कुंकवासाठी फार जपतात,कारण ते त्यांचे सौभाग्यलेणे असते.
कपाळी कुंकू लावण्याची प्रथा आर्य स्त्रियांनी आर्येतर स्त्रियांकडून अवलंबली आहे.कुंकवाचा रंग लाल आहे.अतिप्राचीन मातृसंस्कृतीमध्ये लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. आर्येतर लोक हे मातृप्रधान संस्कृतीचे होते.मातृप्रधान संस्कृतीतील कित्येक दैवते रक्तवर्ण प्रिय असणारी आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज ओबीसी क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य भंडारा च्या वतीने लाखणी तालुका येथे हळदी कुंकुवाचा कार्यक्रम स्वागत लॉन येथे घेण्यात आला.या कार्यक्रमाचे नियोजन सौ.संध्या कसून धांडे या समाजकार्य कर्त्यानी केले होते.या हळदी कुंकू कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका सखी मंचच्या संयोजिका शिवानी काटकर होत्या तर उपाध्यक्ष सारिका शहारे सहउद्घाटक अश्विनी वाघाये,प्रमुख अतिथी संध्या धांडे,सचिव सुनंदा धनजोडे ह्या मंचावर उपस्थित होत्या. हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाप्रसंगी सर्व स्त्रियांना वानांमध्ये झाडाचे रोपटे देण्यात आले आहे.या कार्यक्रमाला सहकार्य सौ.सुनंदा धनजोडे यांनी केले असून या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रीता धांडे यांनी केले आहे.या कार्यक्रमाला प्रांजली सावरकर,उर्मिला वैद्य,सुजना वैद्य,विद्या गिरीपुंजे,अनिता पटले,सारिका गिरेपुंजे,सरस्वताबाई गिरेपुंजे,शांताबाई वैद्य,सौ.भारती बावनकुळे तसेच सर्व ओबीसी क्रांती मोर्चा जिल्हा शाखा भंडारा आणि तालुका शाखा लाखनी चे महिला मंडळी उपस्थित होत्या.