तंबाखुजन्य पदार्थ विक्री कायदयातंर्गत 39 पानटपरीवर कारवाई 7 हजार 600 रुपयांचा दंड वसूल

तंबाखुजन्य पदार्थ विक्री कायदयातंर्गत 39 पानटपरीवर कारवाई
7 हजार 600 रुपयांचा दंड वसूल

तंबाखुजन्य पदार्थ विक्री कायदयातंर्गत 39 पानटपरीवर कारवाई 7 हजार 600 रुपयांचा दंड वसूल

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

वर्धा, : ०४/०२/२०२२ राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा तंबाखु नियंत्रण समिती , अन्न व औषधी प्रशासन विभाग व पोलिस विभाच्या संयुक्त पथकाच्या वतीने हिंगणघाट येथील 39 पानटपरीवर कारवाई करुन 7600 रुपयाचा दंड वसूल केला.
शासननिर्णयानुसार तंबाखु, तंबाखूजन्य पादार्थ, गुटखा आदी पदार्थाच्या सेवनास, थुकन्यास व धुम्रपान करण्यास मनाई आहे. सार्वजनिक ठिकाणी या पदार्थाची विक्री बंदी असतांना या पदार्थांची विक्री होत असल्याचे निर्दशनास आल्याने उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.चाचरकर यांच्या मार्गदर्शनात पानटपरीवर कारवाई करण्यात आली. 39 पानटपरीवर कारवाई करुन 7 हजार 600 रुपयांचा दंड आकारण्यात आला.
सदर कारवाई राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सामान्य रुग्णालय वर्धा, अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यामाने करण्यात आली. सदर कारवाई जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया यांच्या मार्गदर्शनात जिल्हा सल्लागार डॉ. नम्रता सलूजा, समुपदेशक राहुल बुंचुंडे, सामाजिक कार्यकर्ता हर्शद ढोबळे, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक संचालक जयंत वाणे, किरण गेडाम, राजेश यादव, पोलिस उपनिरिक्षक श्री. चव्हाण यांच्या नेतृत्वात मनोज वाघमारे, संदिप खैरकार, संग्राम मुढे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here