सह्याद्री प्रतिष्ठान –माणगाव तळा रोहा विभागातर्फे अभिनव उपक्रम
✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव प्रतिनिधी मृणाली जाधव :-माणगांव तालुक्यातील सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे मकर संक्रांति ते रथसप्तमी या काळात कित्येक घरी सुहासिनी पूजन , तसेच हळदी कुंकू समारंभाचे आयोजन दर वर्षी केले जाते .परंतु, या वर्षी सह्याद्री प्रतिष्ठानच्या माणगाव -तळा-रोहा विभागाच्या दुर्ग सेवकांनी मकर संक्रांति तसेच भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तळा- माणगांव विभागातील वीरांगणांची त्यांच्या घरी जावून सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना तिळगुळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केले .तसेच एक भेटवस्तु ही त्याना आदर व आठवण म्हणून देण्यात आली.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं सौभाग्य गमावलं अशा वीर पत्नी ची आठवण यानिमित्ताने सह्याद्री प्रतिष्ठानने काढली .श्रीमती अनुसया शांताराम कदम, श्रीमती अंजनी शिवराम गोसावी, श्रीमती शेवंती विठोबा कदम, श्रीमती अपूर्वा अमोल उभारे अशी या वीरांगनाची नावे आहेत.
सैन्यात कर्तव्य बजावणाऱ्या वीर सैनिकांची तसेच त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सर्वांनी जाण ठेवायला हवी आणि त्याबद्दल कृतज्ञता ठेवायला हवी या जाणिवेतून ही संकल्पना आम्हाला सुचली असे सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांनी सांगितले. त्याचबरोबर सर्वच समाजाने नेहमी देशसेवेत रुजू असणाऱ्या व हौतात्म्य पत्क्तऱलेल्या सैनिकांबद्दल आस्था ठेवायला हवि असे मत व्यक्त केले.