इंदापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर.

74

इंदापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर.

इंदापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर.

मनोज गोरे
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो.९९२३३५८९७०

इंदापूर ता. ४ फेब्रुवारी २०२४ : १४ एप्रिल २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अखंड विश्वात मोठया उत्साहाने साजरी करण्यात येते. जगातील बहुजन समाज हा उत्सव एका सनाप्रमाणे साजरा करतो. याच मोठ्या उत्साहाच्या तयारीला सुरुवात इंदापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हौसिंग सोसायटी यांच्या प्रस्थापित झालेल्या समिती वरून दिसून येते.

जयंतीचे सर्व सूत्र हे युवक वर्गाच्या हातात देण्यात आले, त्यावेळी अध्यक्ष पवन मखरे व उमेश मखरे, उपाध्यक्ष निखिल मखरे, सचिव सुमित वाघमारे, सहसचिव विनर चव्हाण, खजिनदार श्रीकांत मुखरे, सहखजिनदार सुयोग भोसले व सुमेध मखरे, कार्याध्यक्ष सम्यक सावंत, सहकार्याध्यक्ष संघर्ष मखरे अशी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड सर्व सभासदांच्या सर्वानुमते करण्यात आली.

नव जयंती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने हे सांगण्यात आले की यावर्षी सालाबाद प्रमाणे होणाऱ्या जयंती महोत्सवात अनेक संस्कृतिक, साहित्यिक, कला गुणदर्शन, प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस ठेवला गेला आहे.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हौसिंग सोसायटी इंदापूरचे अध्यक्ष अविनाश मखरे, सचिव राहुल पोळ, बुद्ध व आंबेडकर यांचा सखोल अभ्यास असणारे विलास मखरे, सामजिक कार्यकर्ते प्रदीप साबळे, सुभाष मखरे, बाळू मखरे, नितीन मखरे आदींनी उपस्थिती लावली.