गेल्या वर्षभरात कोकण विभागात भ्रष्टाचाराचे 74 गुन्हे 118 आरोपी, महसूल, पोलीस विभागात सर्वाधिक लाचखोरीची प्रकरणे

35

गेल्या वर्षभरात कोकण विभागात भ्रष्टाचाराचे 74 गुन्हे
118 आरोपी, महसूल, पोलीस विभागात सर्वाधिक लाचखोरीची प्रकरणे

गेल्या वर्षभरात कोकण विभागात भ्रष्टाचाराचे 74 गुन्हे 118 आरोपी, महसूल, पोलीस विभागात सर्वाधिक लाचखोरीची प्रकरणे
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- शासन आपला कारभार भ्रष्टाचार मुक्त करण्याचा प्रयत्न करीत असले तरी लाचखोरी करण्याची प्रवृत्ती कमी होताना दिसत नाही. कोकणातील ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सहा जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षभरात लाचखोरीची 66, अपसंपदा 7 आणि इतर भ्रष्टाचाराचा एक अशी 74 प्रकरणे दाखल झाली आहेत. यात एकूण 118 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2023 च्या तुलनेत गेल्या वर्षी भ्रष्टाचाराची प्रकरणे कमी आहेत. 2023 मध्ये एकूण भ्रष्टाचाराचे 103 गुन्हे दाखल होते.
शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना आपली काम करवून घेताना नेहमीच अडचणींना सामोरे जावे लागत असते. नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये चांगली तत्पर सेवा मिळावी म्हणून शासन उपाययोजना करीत असते. नागरिकांची कामे वेळेत आणि नियमाप्रमाणे व्हावीत यासाठी शासनाने नियमावली जाहीर केलेली असते. मात्र सर्वसामान्य नागरिकांना आपली कामे करवून घेताना अडवणुकीचा सामोरे जावे लागते. अगदी चतुर्त श्रेणीपासून ते प्रथम वर्गाच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांची अडवणूक होत असते. अनेक वेळेला होणाऱ्या त्रासामुळे नागरिक शासकीय कार्यालयाची पायरी चढण्यास धजावत नाहीत.
गेल्या वर्षभरात कोकण विभागातही भ्रष्टाचाराची प्रकरणे सुरुच आहेत. राज्याच्या लाचलुचप्रतिबंधक खात्याच्या ठाणे विभागांतर्गत ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान भ्रष्ट्चाराचे 74 गुन्हे दाखल झाले आहेत.
ठाणे जिल्हयात पोलीस विभाग, महसूल, महानगरपालिका, अन्न व आैषध प्रशासन, सहाय्यक दुय्यम निबंधक आणि ग्रामपंचायत या विभागांमध्ये लाचखोरीची सर्वाधिक प्रकरणे दाखल झाल आहेत. रायगड जिल्हयात महसूल, पोलीस, आरोग्य, भूमी अभिलेख या विभागांतील भ्रष्टाचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. रत्नागिरी जिल्हयातील महसूल, भूमी अभिलेख, सहकार विभागातील भ्रष्टाचाऱ्यांना चाप लावला आहे. पालघर जिल्हयात वनविभाग, आरटीओ, महसूल, भूमीअभिलेख, वीज वितरण विभागातील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई केली आहे. नवी मुंबई विभागातील मनपा, पंंचायत समिती, महसूल, वीज वितरण, पोलीस विभागातील लाचखोरांवर सापळा लावून कारवाई केली आहे.

1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या एक वर्षाच्या कालावधीत राज्य लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या ठाणे विभागातील सहा जिल्ह्यात लाच मागितल्या प्रकरणी 66 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 98 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपसंपदा प्रकरणी सात गुन्हे दाखल असून यात 15 आरोपी आहेत. अन्य भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा एक गुन्हा असून 5 आरोपी आहेत. गेल्या वर्ष भरात लाच मागणे, अपसंपदा आणि इतर भ्रष्टाचाराचे एक अशी 74 गुन्हे दाखल असून यात 118 जणांवर गुन्हा दाखल आहेत.

चाैकट-
2023 मध्ये अधिक गुन्हे
2024 या वर्षात लाच मागणे, अपसंपदा आणि इतर भ्रष्टाचाराचे एक अशी 74 गुन्हे दाखल असून यात 118 जणांवर गुन्हा दाखल आहेत. मात्र 2023 मध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची संख्या अधिक होती. लाच मागीतल्या प्रकरणी 103 प्रकरणांमध्ये 144 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. तर अपसंपदा व इतर भ्रष्टाचाराचा एकही गुन्हा दाखल नव्हता.